वॉशिंग्टन,
भारतीय अमेरिकन बालसंशोधक गीतांजली राव हिला यूएस फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बुधवारी व्हाईट हाऊस येथेे आयोजित गर्ल्स लीडिंग चेंज कार्यक‘मात फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या हस्ते Gitanjali Rao गीतांजली राव हिचा सत्कार पार पडला.
Gitanjali Rao गीतांजली राव ही हायलँड्स रँच, कोलोरॅडो येथील बाल संशोधक आहे. तिने शिसे दूषिततेचा शोध लावणार्या उपकरणाचा शोध लावला. यातून तिला अमेरिकेचा टॉप यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळवून दिला.