विश्वमंगलाची कामना करणार्‍या संतश्रेष्ठांचा मार्गसुधा मूर्तींना आपलासा वाटतो

12 Oct 2023 17:47:54
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Sudha Murthy सुधा मूर्तींच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करीत असताना, आपल्या लक्षात येते की, विश्वमंगलाची कामना करणार्‍या संतश्रेष्ठांचा मार्ग त्यांना अधिक आवडतो आणि आपलासा वाटतो, असे उद्गार पुसद येथील डॉ. अंजली पांडे यांनी काढले.निवृत्त अभियंता मित्र मंडळाद्वारे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना काढले. ‘मूल्याधिष्ठित जीवनाचा आदर्श सुधा मूर्ती’ असा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता.
 

सुद्धा मुर्थ्य  
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवृत्त अभियंता मित्र मंडळाचे अध्यक्ष वसंत पांडे आणि व्याख्यानमालेच्या या पुष्पाचे प्रायोजक प्र. मा. रुईकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उदय नावलेकर यांच्या हस्ते वक्त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आपल्या भाषणात डॉ. अंजली पांडे पुढे म्हणाल्या, अतिशय कुशाग‘ बुद्धीच्या, कुशलतेने काम करणार्‍या आणि सिद्धहस्त लेखक असणार्‍या सुधा मूर्ती साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे मूल्य जोपासणार्‍या आहेत.त्यांनी ज्या व्यक्तीरेखा रेखाटल्या त्या त्यांना प्रत्यक्ष जीवनात भेटलेल्या आहेत.Sudha Murthy त्या काल्पनिक नाहीत हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्य आहे. जेआरडी टाटा त्यांच्यापासून सामाजिक कार्याची प्रेरणा घेतलेल्या आणि 2006 मध्ये पद्मश्री मिळालेल्या सुधा मूर्तींना त्यांचा साधेपणा एका वेगळ्या उंचीवर नेतो. गीतेतील कर्मयोग त्या जीवनात जगताना दिसतात, असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे संचालन अभियंता अशोक तिखे यांनी केले. प्रास्ताविक सचिव अभियंता उत्तम राठोड यांनी केले. वक्त्यांचा परिचय संयोजक प्रमोद देशपांडे यांनी करून दिला. स्वागतगीत वसुधा पांडे यांनी सादर केले. तर आभारप्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष लालसिंग अणे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0