अन्यथा सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई

12 Oct 2023 19:15:01
अकोला,
action taken against Sarpanch घरकूल लाभापासून पात्र अर्जदार वंचित राहिल्यास किंवा घरकुलाचा लाभासाठी अपात्र व्यक्तीची निवड झाल्यास संबंधित सरपंचावर कारवाई तर ग्रामसेवकाला निलंबित करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अध्यक्षांनी दिला आहे. त्यांनी याबाबतचे पत्र सर्व गट विकास अधिकार्‍यांना पाठवले आहे.
 
 
action taken against Sarpanch
 
सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असणार्‍या व इतर मागास प्रर्वगातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून हालचाली करण्यात येत आहेत. मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून आवास प्लसमधील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांची संख्या 23 हजार 967 राहणार आहे. सन 2023-24 करिता 7190, सन 2024-15 करिता 7190 तर सन 2025-26साठी 9 हजार 587 ऐवढे उद्दिष्ट आहे.जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांना पत्र पाठवून मोदी आवास घरकुल योजनेबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव ग्राम सभेतर्फे ठरावासह प्राप्त करून घ्यावे, तालुक्यातील प्रस्तावांची व्यक्तिश: पडताळणी व खात्री करावी. action taken against Sarpanch ग्रा.पं.मध्ये ग्राम सभेतर्फे लाभार्थ्यांची निवड न झाल्यास कार्यवाही करावी. परिपूर्ण प्रस्ताव इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली निवड ग्रामसभेद्वारा होणार असून, ग्राम सभेने निवड केलेल्या लाभार्थ्यांची अंतीम निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे.या समितीच्या अध्यक्षपदी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व उपअभियंता हे सचिव म्हणून काम करणार असून, सदस्य सचिव म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0