ब्रिटीशकालीन विश्रामगृहे
- प्र.सु. हिरुरकर
dhakna-amaravati पोर्णिमेच्या दुधाळ चंद्रप्रकाशात ढाकणा विश्रामगृहावर पोहचलो. भव्य अशा वड वृक्षांच्या छोयेत हे देखणे विश्रामगृह सुस्तावले आहे. पुढयातून गडगा नदीच्या वाहत्या प्रवाहाचा खळखळता आवाज परिसराला मंत्रमुग्ध करत होता. पलीकडच्या सागगारातून घुग्गू घुग्गू असा घुबडांचा आवाज येत होता. dhakna-amaravati रातव्यांचे चक्कू चक्कू चक्कू अंधारगान सुरु होते. काही वेळाने सांबराचे पोंक् पोंक् आवाज येवू लागले. शिकारी प्राणी दिसल्यावर ते असा आवाज काढतात. त्यामुळे इतर मृगवर्गीय प्राणी सावध होतात. बरीच रात्र झाली होती. चन्द्रप्रकाशाने केवळ विश्रामगृहावरच नव्हे तर संपूर्ण जंगलावर एक अनोखी जादू पसरविली होती. dhakna-amaravati दिवसभरातील पायपिटीचा थकवा असूनही झोप येत नव्हती म्हणून मी व्हरांडयातील वेताच्या खुर्चीवर येवून बसलो. गार वारा सुटला होता. विश्रामगृह व अवतीभोवतीच्या हिरव्या रानावर दुधाळ झाडावरुन घुग् घुग् असा कुत्रं भुकत असल्याचा आवाज ऐकू आला. dhakna-amaravati मला प्रश्न पडला कुत्रं झाडावर कसे? मी टॉर्च हातात घेतला.
पिंपळाजवळ जाऊन पोहोचलो. आवाजाचा कानोसा घेत वर ढोलीला लागून असलेल्या फांदीच्या पानोळयात प्रकाशझोत टाकला. दोन-अडीच फुटाचा पक्ष्याचा चेहरा दिसला. चेहरा नारळातील डोलाप्रमाणे दिसत होता. dhakna-amaravati बटनबटीत टपोऱ्या डोळयातील बुबूळं फिरत होती. ते टॉर्चच्या दिशेनेच पहात होते. त्याच्या डोक्यावर पिसांची दोन शिंगं होती. ती होती हुमा घुबडाची मादी. कुत्र्याच्या आवाजाची ती नक्कल करीत होती. प्रकाशात तिचे डोळे हिरवे पिवळे दिसत होते. पुन्हा माझ्याकडे वाकून पाहत होती. माझ्या अंगावरचे केसं भीतीनं ताठरल्या गेले. एवढयात पलीकडच्या पळस वृक्षावरुन तसाच आवाज आला. वातावरणात गंभीरपणा जाणवला. एवढयात पिंपळावरच्या घुबडाने आपल्या भल्या मोठया पंखांची उघडझाप केली आणि एक उड्डाण भरुन पलीकडच्या पळस वृक्षाच्या झाडावर जाऊन बसली. dhakna-amaravati बहुतेक नराजवळ ती जाऊन बसली असावी. कदाचित माझ्या हालचालीमुळे तिला असुरक्षित वाटले असावे. मला तेथील वातावरणात गूढता वाटू लागली. त्यामुळे मी परत विश्रामगृहाच्या व्हरांडयात जाऊन बसलो. मध्यरात्र झाली होती. डोळे ताठरले होते. पलंगावर पडल्या पडल्या डोळे कधी लागले हे कळलेच नाही.
आँहू,आँहू,आँहू या व्याघ्रगर्जनेने माझी रानपहाट जागी झाली. नदीपलीकडच्या झाडो-यातून ही गर्जना ऐकू येत होती. काही अंतरावर दूरवरुन परत असाच आवाज एकसारखा येत होता. मे महिना हा वाघांचा मीलनकाळ असतो. मादी वाफेवर आली की नरासोबत समागमासाठी तीचा हा प्रयत्न असतो. साद प्रतिसादाचे हे नाटय जवळपास एक दीड तास सुरु होते. काही वेळाने ते आपोआप कमी झाले. कदाचित व्याघ्र नरमादीचे मीलन झाले असावे. dhakna-amaravati ढाकणा येथे ब्रिटीशांनी १९०८ सली विश्रामगृह बांधले आहे. पूर्वी येथे आदिवासी कोरकू वनमजूरांचा पडाव होता. येथेच त्यावेळी इंग्रज अधिका-यांच्या विश्रांतीसाठी विश्रामगृह बांधण्यात आले. विश्रामगृहासमोरुन मोठमोठया दगडी, काळया शिळांमधून गडगा नदी वाहते. नदीच्या पलीकडे सागाची घनगर्द वनराई असून या भागात पक्ष्यांचा वावर फार मोठया प्रमाणात आहे. डकना याचा अर्थ कोरकू वनमजुरांनी गो-या साहेबाला दिलेली एक शिवी. डकना म्हणजेच आजचे ढाकणा. ढाकणा वनपारिक्षेत्राचा समावेश ब्रिटीश काळत गुगामलच्या जंगल क्षेत्रात होता. विश्रामगृहापासून अंदाजे दीड किलोमीटर ढाकणा हे गाव आहे. dhakna-amaravati तेथे आदिवासी कोरकू राहातात. ढाकणा विश्रामगृह म्हणजे मेळघाटच्या निसर्ग सौंदर्याला भूल पाडणारं एक देखणं विश्रामगृह आहे.
वड-पिंपळाच्या अंदाजे दोनशे वर्षाच्या प्रचंड महावृक्षांच्या छायेत या विश्रामगृहाची देखणी वास्तू उभी आहे. दोन आरामकक्ष, एक जेवन कक्ष, एक ड्रेसिंग रुम आहे. आतमध्ये ब्रिटीशकालीन लाकडी फर्निचर आजही उपयोगात आणले जात आहे. डायqनग रुममध्ये चिमणी आणि त्याच्या छतावर पोहोचलेला धुरांडा आहे. dhakna-amaravati ब्रिटीश अधिकारी थंडीच्या दिवसात येथे लाकडाची अग्नी पेटवून उब घेत असत. बाहेर व-हांडा असून येथे बसून कदाचित त्याकाळी मजुरांना निर्देश देणे, अधिकारी-कर्मचा-यांना सूचना देणे इत्यादी कामे ते करत असावेत. विश्रामगृहाच्या बाजूला स्वयंपाक कक्ष आणि कर्मचा-यांचे निवासस्थान आहे. जवळपास दोन-तीन एकर जागेतील या विश्रामगृहाच्या पुढयात गडगा नदी वाहते. काळयाशार प्रचंड दगडी शीळांमधून नदीच्या खळखळण्याचा नादमधुर ध्वनी परिसरात गुंजन करत असतो. dhakna-amaravati नदीच्या पलीकडे साग वृक्षांची दाटी आणि त्यातून ऐकू येणारे नानाविध पक्ष्यांचे मंजूळ आवाज लक्ष वेधून घेतात. व्याघ्र प्रकल्पाने या विश्रामगृहाच्या मूळ रुपाला धक्का न देता वेळोवेळी नूतनीकरण करुन ही देखणी वास्तू अत्यंत चांगल्या अवस्थेत ठेवली आहे.
dhakna-amaravati ढाकणा विश्रामगृह म्हणजे एक स्वप्नातील वास्तू वाटते. येथे एकदा भेट देणारा पर्यटक त्याच्या प्रेमात पडल्या वाचून राहत नाही. मात्र, हा भाग काहीशा दुर्गम भागात असल्यामुळे येथे येणा-यांची फारशी संख्या नसते. ढाकणा या गावचे मोत्या बुढा जावरकर हा पटेल होता. त्याचा आजा कालू पटेल या पठारावर झोपडी करुन राहत होता. कालू पटेलला जवळपास पन्नास मुले होती, असे समजते. या सर्वांनी मिळून त्यांनी वसवलेला पडाव म्हणजे ढाकणा होय. १८६० च्या आसपास कालू पटेल ढाकण्याला स्थायिक झाला असावा. dhakna-amaravati कोरकू जमातीच्या भुल्या सानु दाहेकर हा सुमारे ८० वर्षाचा वृध्द ढाकणा गावात राहातो. या परिसरात ब्रिटीश अधिका-यांनी चित्ता, वाघाच्या शिकारी केल्याचे तो सांगतो. १९३५-४० पासून ब्रिटीशांनी गुगामल जंगलाचे अतोनात नुकसान केले. शिका-यांमध्ये ब्रिटीश मॅडमही होत्या. त्यातील गोरीबाई ही अत्यंत भयानक स्वभावाची होती.
दोन वाघ आणि दोन सांबर यांचा शिकार परवाना घेऊन आल्यावर ती एका मुक्कामात पाच ते सहा वाघांची शिकार करायची. मात्र ती रेकॉर्डमध्ये दोन वाघांचीच शिकार केल्याचे दाखवत असे सांगतांना भून्या म्हणतो - हे जंगल स्वातंत्र्यापूर्वी अत्यंत घनगर्द होते. dhakna-amaravati दुस-या महायुध्दाच्या काळात ब्रिटीशांनी या जंगलातून सागाची प्रचंड तोड केली. महाराष्ट्राच्या वन विभागाने ढाकणा-कोलकास परीक्षेत्राला १९६९ साली अभयारण्याचा दर्जा दिला. १८६० नंतर ढाकणा वनपरिक्षेत्र अस्तित्वात आल्याचे समजते. मात्र त्याचा पुरावा उपलब्ध नाही. ढाकणा येथे संपन्न असे पक्षिवैभव आहे. याच परिसरात बिटकील पाटी नाल्यात पक्षितज्ज्ञ डॉ.प्राची मेहता यांनी काळया टोपीच्या खंडयाचा शोध लावला आहे. dhakna-amaravati गडगेच्या तीरावरील ढाकणा विश्रामगृहातील प्रत्येक मुक्काम कायमचा आठवणीत राहतो तो रानावनातील अनुभव व वन्यप्राण्यांची सोबत घेऊनच !
९८२२६३९७९८