मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया : सुवर्णा रंगारी

12 Oct 2023 12:17:39
नागपूर,
 
vidyarthi sudhar sangh-nagpur  महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल वानाडोंगरी येथे शनिवार, ७ ऑक्टोबरला 'मासिक पाळीच्या समस्या व उपाय' यावर पी.ए.फाऊंडेशन द्वारा सेमिनारचे आयोजन करण्यात आले. vidyarthi sudhar sangh-nagpur आजच्या वैज्ञानिक काळातही महिला वर्गात मासिक पाळीबद्दल बरेच अज्ञान व अंधश्रद्धा असून, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या शिष्या उमाईसाला मार्गदर्शन करताना, मासिक पाळीबद्दल असलेल्या कल्पना खोडून काढल्या होत्या. vidyarthi sudhar sangh-nagpur
 
 

vidyarthi sudhar sangh-nagpur  
 
 
ज्याप्रमाणे नाकातून शेंबूड येतो, डोळ्यांत चिपड येतो, कानात मळ येतो त्याचप्रमाणे मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून, ती येते आणि निघून जाते, त्यामुळे तिचा विटाळ मानू नये, असा वैज्ञानिक दृष्टिकोन १२ व्या शतकात दिलेला होता. vidyarthi sudhar sangh-nagpur  आज समाजात मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमजुती असून, महिलांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. मासिक पाळीत पर्यावरणाला हानी पोहोचवण्यार्‍या प्लॅस्टिक मुक्त सॅनेटरी नॅपकीनचा वापर विद्यार्थिनींनी व महिलांनी करावा, असे मार्गदर्शन पी.ए.फाऊंडेशनच्या सुवर्णा रंगारी यांनी केले. vidyarthi sudhar sangh-nagpur  यावेळी पी. ए. फाऊंडेशनच्या रंजिता श्रीवास, महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूलच्या दीपाली कोठे, नाजुका म्हैसकर, विद्यार्थिनी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0