नागपूर,
CCTV camera रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन मध्य रेल्वेने आता नागपूर विभागासह इतर विभागातील 311 रेल्वे डब्यांमध्ये 1 हजार 924 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. धावत्या रेल्वेत दिवसाढवळया होत असलेल्या चोरीचे प्रकार उघड होणार आहे. मुख्यत:रेल्वे डब्यांमध्ये सर्व हालचाली या कॅमेर्यांमध्ये रेकॉर्ड केल्या जात आहे. त्यामुळे विविध प्रकारातील गुन्ह्यांना आळा मोलाची मदत होणार आहे.
प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानाची चोरी, दागिने, छेडछाड आदी प्रकार घडत असतात. यासर्व घटनांमध्ये रेल्वेतील कॅमेर्याची मदत गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास होणार आहे.CCTV camera नव्याने सुरु झालेल्या वंदे भारत ट्रेनच्या 364 कोच, डेमू, मेमू आणि एलएचबी कोचमध्ये 2 हजार 132 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय 81 इएमयु रेकच्या लेडीज कोचमध्ये टॉकबॅक सिस्टीम बसवण्यात आली आहे.