शिरपूर जैन,
Jijamata Vidyalaya युवक क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाक्रीडाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वर्ष वयोगट मैदानी क्रीडास्पर्धेत जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांगरी नवघरे संपन्न झालेल्या वाशीम जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्षीय वयोगटातील गणेश धनगर लांब उडी प्रथम,अभिषेक आढाव ४०० मीटर धावणे द्वितीय, दर्शन नवघरे १०० मीटर धावणे द्वितीय,४ बाय १०० रिले प्रथम गणेश धनगर,दर्शन नवघरे, अभिषक आढाव,कार्तिक नवघरे,कृष्णा नवघरे ,यांची विभागीय स्तरावर अकोला येथे खेळण्यासाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडुचे संस्थाध्यक्ष तथा माजी आ. विजयराव जाधव, सचिव रंगनाथ पांडे, उपाध्यक्ष सुनील जाधव, संचालक राम जाधव, अंजिक्य जाधव, यांनी अभिनंदन केले आहे. Jijamata Vidyalaya या विजेत्या खेळाडू साठी क्रीडाशिक्षक विलास खराटे यांनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी खेळाडुंचे विद्यालयात प्राचार्य राधेश्याम घुगे, नवनाथ मुठाळ, प्रा. गोकुळ राठोड, प्रा. संतोष वाझुळकर, प्रा. पंकज ईश्वरे, प्रा. योगेश पवार, परमेश्वर वाळूकर, गणेश वाझुळकर, रामेश्वर मानवतकर, गणेश बाजड, रवी जंजाळकर, वैशाली धंदरे, उमेश लहाने, अनंत जहागिरदार, संदीप देशमुख, बळीराम नवघरे, मोहन सिरसाट, नितेश हजारे सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व विजयी खेळाडुं चे पांगरी नवघरे, खडकी, जांभरुवाडी, अमानी, मसला पालक वर्गातून स्वागत होत आहे.