तभा वृत्तसेवा
भंडारा,
Kesari Kusti महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणेच्या मान्यते नुसार भंडारा जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाच्या वतीने 15 आक्टोबर ला सकाळी 9 वाजता जिल्हास्तरिय निवड चाचणीचे आयोजन संताजी सभागृह बेलघाटा वार्ड पवनी येथे केले आहे.महाराष्ट्र केसरी वरिष्ठ गटाची भंडारा जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धेत गादी व माती प्रकारात वजन गट 57 किलो, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व 86 ते 125 किलो वजन गटात निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या स्पर्धकाला नोव्हेंबर महिन्यात फुलगाव ता.हवेली, जि.पुणे येथे होणाèया वरीष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी करिता संधी मिळणार आहे.Kesari Kusti भंडारा जिल्ह्यातील पहेलवानांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन तालीम कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत व्यंकटराव खोब्रागडे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत सेलोकर, सचिव रामदास वडिचार, नामदेव सुरकर, हरिश तलमले, डॉ. मनोज देशमुख, प्रशांत मानापुरे, गोपाल भिवगडे, विकास देशमुख, दिनेश तलमले, नरेश तेलमासरे, गोविंदा देशमुख, गोपाल परिहार, परवेश देशमुख यांनी केले आहे.