डेंग्यूने बालकाचा मृत्यू

    दिनांक :15-Oct-2023
Total Views |
टेंभुर्डा,
dengue आटमुर्डीचे माजी सरपंच विठ्ठल योगी यांचा चार वर्षीय मुलगा युग विठ्ठल जोगी (रा. टेंभुर्डा) याचा रविवार, 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास डेंग्यू आजाराने मृत्यू झाला.
 
 
dengue
 
मागील एक महिन्यापासून त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याच्यावर चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. dengue युग हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पार्थिवावर आटमुडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.