साखरखेर्डा,
Taluka Development : नविन तालुका निर्मिती संदर्भात शासनाने अहवाल मागविले असून या संभाव्य तालुका निर्मितीत साखरखेर्डा तालुक्याचा समावेश असल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत . तब्बल 30 वर्षांपासून तालुका मागणी केली जात होती . यावेळी शासनाने दखल घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत अहवाल मागविला आहे .
साखरखेर्डा तालुका निर्मिती व्हावी म्हणून सर्व प्रथम वसंतराव मगर यांनी समिती स्थापन केली होती . त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि तत्कालीन महसूल मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तालुका मागणीचा प्रस्ताव सादर केला होता . ना. छगन भुजबळ यांनी तातडीने प्रस्तावाची दखल घेऊन 18 डिसेंबर 1992 रोजी अमरावती विभागीय आयुक्त पत्रा नुसार साखरखेर्डा तालुका निर्मितीसाठी आवश्यक क्षेत्रफळ , लोकसंख्या , गावाची संख्या , ग्रामपंचायत ठराव , जागेसाठी करार पत्र याबाबत माहिती मागवली होती . Taluka Development सर्व बाबी सकारात्मक असताना तालुका निर्मिती काही कारणाने लांबली होती . त्यानंतर आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांना साखरखेर्डा तालुका मागणी समितीचे अध्यक्ष करुन त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती . त्यांनी युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि महसूल मंत्री नारायण राणे यांच्याकडे सर्व समिती सदस्यांनी मागणी केली होती . परंतू नारायण राणे मुख्यमंत्री होताच महाराष्ट्रात नविन 20 तालुके घोषीत करतांना साखरखेर्डा वगळले होते .
आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला होता . त्यात अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते . सतत मागणी करुनही तालुका होत नाही . म्हणून नागरिकांचा भ्रमनिरास झाला . Taluka Development आणि मागणी पुर्ण होत नाही म्हणून पाठपुरावा करणे बंद केले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी नविन तालुका निर्मिती संदर्भात निर्णय घेतल्याचे समजते . त्यासाठी पुन्हा साखरखेर्डा गावचे नाव समोर आले आहे . साखरखेर्डा येथील लोकसंख्या 25 हजार असून साखरखेर्डा , शेंदुर्जन मलकापूर पांग्रा , मेरा बु . , देऊळगाव माळी या चार जिल्हा परिषद सर्कलमधील 85 गावांचा समावेश या नविन तालुक्यात होऊ शकतो . चिखली तालुक्यातील काही गावे सिंदखेडराजा मतदार संघात आली आहेत . ती गावे संभाव्य साखरखेर्डा तालुका निर्मितीत समाविष्ट झाली तर गावांची संख्या वाढू शकते .
9 आक्टोंबर रोजी शासनाने अमरावती विभागीय आयुक्त यांना Taluka Development साखरखेर्डा तालुका निर्मिती संदर्भात सुधारीत निकष पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत . ते आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाले आहेत . 31 आक्टोंबर पर्यंत तालुका निर्मिती संदर्भात सुधारीत अहवाल सादर करावयाचा आहे . यासाठी लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे .