यवतमाळ,
Navratri : चैतन्य सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी यंदा कलकत्ता येथील दक्षिणेश्वरी मंदिरातील महाकाली प्रतिमेच्या स्वरूपात नवरात्रीनिमित्त स्थापना केली आहे. दरवर्षी विविध शक्तीपीठातील जगदंबा स्वरूपात आवाहन करण्यात येते. यंदा श्री रामकृष्ण परमहंस यांची पूजन केलेली व आराध्य देवता असलेली दक्षिणेश्वरी कालीमाता दर्डानगर येथील सहस्रबुद्धे यांच्या निवासस्थानी स्थापन केली आहे. त्यानिमित्य रोज रात्री भजनसेवा सादर होणार आहे. पराग हेडाऊ कालीमातेच्या प्रतिमेचे शिल्पकार आहेत.