नागपूर,
Writer Ami Ganatra : महाभारतातील धर्मयुद्धाने भारतभूमी हादरून हजार वर्षे उलटली आहेत. मात्र तरी सुध्दा आपल्या पूर्वजांचा हा इतिहास आपल्याला आजही भुरळ घालत आहे. महाभारतातील 8 हजार 800 श्लोकातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. वेद महर्षी व्यास रचित महाभारतातील अनेक प्रसंग आपणास आजही विचार करण्यास लावतात. जीवन जगण्याची शिकवण वाल्मिकी रामायण व वेद महर्षी व्यास यांच्या महाभारतातून आपणास मिळत असल्याचा विश्वास प्रसिध्द लेखिका अमी गणात्रा यांनी व्यक्त केला.
महाभारत उलगडले या त्यांच्या पुस्तकाबददल मंथनच्या वतीने चिटणीस सेंटर येथे आयोजित मुक्त संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाभारतावर अनेक पुस्तके लिहिल्या गेल्या आहेत. लेखकांनी आपल्या पुस्तकात महाभारतातील युद्धाची भौगोलिक व्याप्ती काय होती? द्रोणाचार्याने कर्णाला आपला शिष्य मानण्यास खरंच नकार दिला होता का? इंद्रप्रस्थची राणी म्हणून द्रौपदीच्या जबाबदार्या काय होत्या? तिने कधी दुर्योधनाची थट्टा केली होती का? पांडवांच्या मुलांनी कोणती भूमिका बजावली? युद्धानंतर काय झाले? हे आणि इतर अनेक वेधक प्रश्न समकालीन वाचकाला पडतात. लेखिका (Writer Ami Ganatra) अमी गणात्रा यांनी त्यांच्या पुस्तकातून सामान्यतः ज्ञात नसलेल्या किंवा चुकीने ज्ञात नसलेल्या पैलूंबद्दल प्रकाश टाकला.
प्रसिध्द चित्रपट निर्माते.बी.आर.चोपडा यांनी दूरचित्रवाणीव्दारे महाभारत घरोघरी पोहोचविले. आजच्या युवा पिढीने रामायण व महाभारतासारख्या इतिहासिक ग्रंथातून आदर्श घेण्याची खरी गरज आहे. कार्यक्रमाचे संचालन अंकीता देशकर यांनी केले तर आभार रोहीणी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.