मोहाडी,
Gurukul Vidya Mandir येथील गुरुकूल विद्या मंदिरात माजी राष्ट—पती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महादेव मोटघरे, शंकर मेहर, नरेंद्र निमकर, प्राचार्य एस.आर. निमजे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलीत करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन लावून विद्यार्थ्यांनी आवडत्या ग्रंथाचे वाचन केले. Gurukul Vidya Mandir कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका डेकाट तर आभार शिक्षीका गायधने यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहकार्य केले.