नागपूर,
SEC railway-Nagpur दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कॉलनी, बेलीशॉप मोतीबाग, कामठी रोड येथील प्राचीन श्री शिव मंदिरात मोफत नेत्र उपचार शिबिराने शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. SEC railway-Nagpur मंदिर परिसरात सकाळी ११ वाजता मोहता परिवाराकडून अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ४५१ कुटुंबांनी मनोकामना अखंड ज्योत प्रज्वलित केली.SEC railway-Nagpur
नवरात्रोत्सवानिमित्त कै. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तपासणी करून गरजूंना चष्मे देण्यात आले. SEC railway-Nagpur या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सरदार नवनीतसिंग तुली, सामाजिक कार्यकर्ते दिनेश इलमे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले.SEC railway-Nagpur
सौजन्य : डॉ. प्रवीण डबली, संपर्क मित्र