नागपूर,
garbage-nagpur-anger मनपा हनुमाननगर झोनला लेट लतिफीची सवय झाली आहे. आरोग्य विभाग, झाडांच्या फांद्या उचलणे, मलमा उचलण्याचे काम महिनोनमहिने करीत नाही. garbage-nagpur-anger त्यामुळे सणासुदीच्या वेळी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या 45 दिवसांपासून ठिकठिकाणचा मलमा उचलला न गेल्याने सोमवारी परशु ठाकुर यांच्या नेतृत्वात माजी नगरसेविका रुपाली ठाकुर यांच्या अध्यक्षतेत झोन कार्यालयात आरोग्य अधिकारी कलोडे यांच्या कक्षापुढे मलमा टाकण्यात आला. garbage-nagpur-anger दोन दोन महिने गडर चोकेजची दुरुस्ती होत नाही, प्रभागात नियमित साफसफाई नाही, याकडे अधिकार्यांचे लक्ष वेधण्यात आले. नवरात्री सुरू झाली पन सर्व मंदिरांसमोर कचर्याचे ढिगारे पडलेली आहेत, ही बाबही स्पष्ट करण्यात आली.
ऑपरेटर 30 लीटर डीजलच्या मागे 300 रुपये रोज मागत असल्याचे लेखी तक्रार यावेळी करण्यात आली. एक अधिकारी 13, 14 वर्षे एकाच झोनमध्ये राहिला तर असेच प्रकार होतील, म्हणून लवकरात कलोडे यांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली. यापुढेही जनतेची कामे न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. garbage-nagpur-anger आंदोलनात अमोल वानखेडे, गौरव सिंगरवाडे, वेदांग उपगडे, वैभव उमप, आलोक कावळे, सचिन डोरलीकर, नीलेश नाबड, अभिनव जिकार, स्वरूप कोडमलवार, धनजय डाखोडे, ढोके काका, अनिल क्षीरसागर, गिर्हे काका, अमित देसाईं, राजू मुलकर आदी अनेक नागरिक उपस्थित होते.
सौजन्य : वैभव जोशी, संपर्क मित्र