अग्रलेख
hamas-isreal-war इस्रायल आणि हमासमधील संघर्ष लवकर संपायला तयार नाही. या युद्धात हजारो जणांचा बळी गेला. या युद्धामुळे जगाची दोन गटांमध्ये विभागणी होत आहे. युद्ध मध्यपूर्वेत चालू असले, तरी त्याचा फटका जगाला बसला आहे. अमेरिकेतील ट्विन टॉवर आणि मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या व्हाव्यात, अशा प्रकारचा हा हल्ला असून इस्त्रायल पॅलेस्टाईनला नेस्तनाबूत करूनच थांबेल, असे चित्र पाहायला मिळत आहे. hamas-isreal-war इस्रायलने आतापर्यंत हमासच्या सहा कमांडरांना यमसदनी धाडले आहे. हमासच्या सर्व अतिरेक्यांना संपवूनच इस्रायल मोकळा श्वास घेईल, असे दिसते आहे. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात सारे जग होरपळून निघते आहे; मात्र ज्या इस्रायलकडे सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान होते, जगातील सर्वात शक्तिशाली अशी मोसादसारखी गुप्तचर यंत्रणा होती, त्या देशावर हल्ला कसा झाला, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
‘आयर्न डोम' नावाची रॉकेट किंवा क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा हमासच्या मिसाईल्सनी कशी भेदली, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले होत आहेत. hamas-isreal-war दोन्हीकडच्या रहिवासी भागांवर हल्ले होत आहेत. रस्ते-चौक आणि निवासी भाग युद्धभूमीत बदलले आहेत. इस्रायलकडून गाझा पट्टीतल्या एका इमारतीवर हल्ला झाला आणि काही क्षणात इमारत बेचिराख झाली. आकाशात काळोख, चहुबाजूंनी येणारे हल्ल्यांचे आवाज आणि भेदरलेले लोक हेच चित्र दोन्हीकडे आहे. इस्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत सुमारे पाच हजारांपेक्षाही जास्त लोकांचा जीव गेला. hamas-isreal-war इस्रायल हा जेमतेम ९५ लाख लोकसंख्येचा देश आहे आणि त्याच्या चारही बाजूंना शत्रुराष्ट्रे; मात्र यावेळी हमास या संघटनेच्या हल्ल्यामागे इस्रायलच्या आयर्न डोमच्या सिद्धतेबाबत शंकाही उपस्थित होत आहे. hamas-isreal-war इस्रायलचे आयर्न डोम काही भागात सक्रिय होते; मात्र काही भागात या यंत्रणेला चकवा देत क्षेपणास्त्रे इस्रायलच्या भूमीवर आदळली. रडार युनिट, टार्गेट युनिट आणि हे फायर युनिट असे तीन भाग मिळून इस्रायलचे आयर्न डोम बनले आहे. ही तीनही उपकरणे इस्रायलची हवाई सुरक्षा करतात. hamas-isreal-war शत्रूने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला की, त्याच्या काही सेकंदांमध्येच रडार युनिट त्या रॉकेटला ट्रॅक करते.
टार्गेट युनिट त्याच्या वेगाचा अंदाज घेऊन लक्ष्य करते आणि फायर युनिटमधून निघणारे मिसाईल हवेतच शत्रूच्या हल्ल्याला प्रतिबंध करते; मात्र या वेळी हमासने या आयर्न डोम यंत्रणेतल्या त्रुटी शोधल्या. सर्वाधिक कमी अंतरावरून हल्ला केला. दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळात जास्त रॉकेट हल्ले झाल्याने आयर्न डोम यंत्रणा पूर्ण ताकदीने हल्ले रोखू शकली नाही. hamas-isreal-war हमासने फक्त २० मिनिटांत इस्रायलवर पाच हजारांहून जास्त रॉकेट हल्ले केले. याबाबतची चर्चा जगभर सुरू असताना इस्रायल आणि हमासमधल्या युद्धाची बीजे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. या संघर्षाची बीजे अनेक वर्षांपूर्वीच्या घडामोडींमध्ये दडली आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन-वेस्ट बँक आणि गाझा पट्टीच्या भूभागावर १९४८ पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती. hamas-isreal-war दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यूंसाठी इस्रायलची स्थापना केली गेली. १९४८ मध्ये या परिसरातील हिरव्या रंगाचा भूभाग पॅलेस्टाईन बनला तर निळ्या रंगाचा भूभाग इस्रायल म्हणून घोषित झाला. मात्र इजिप्त, सीरिया, जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रालयच्या निर्मितीला विरोध करीत १९४९ मध्ये इस्रायलवर हल्ला केला. hamas-isreal-war एकट्या इस्रायलने चारही देशांना युद्धात पराभूत केले. मात्र, जॉर्डनकडे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागाचे नियंत्रण आले, तर गाझा पट्टी म्हणवल्या जाणाèया या भागात इजिप्तने कब्जा केला.
यावेळी पॅलेस्टाईन या देशाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले. १९६७ मध्ये पुन्हा युद्ध झाले. hamas-isreal-war इस्रायलने जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि इजिप्तकडून गाझा पट्टीवर कब्जा केला. जवळपास पूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलच्या ताब्यात गेला. १९९३ मध्ये इस्रायल नियंत्रित भागाबाबत पॅलेस्टाईनशी शांती करार झाला. दोन्ही देशांनी एकमेकांचे अस्तित्व मान्य केले, पण पाच वर्षांनंतर करार संपुष्टात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा वाद सुरूच आहे. पुढे गाझा पट्टीतून इस्रायलने हजारो सैनिक मागे घेतले. त्याच भागात हमास नावाची संघटना जन्माला आली. तिचे उद्दिष्ट इस्रायलचा खात्मा करणे हे आहे. hamas-isreal-war अमेरिका आणि अफगाणिस्तान या वादात तालिबान ही एक संघटना होती तसेच इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात हमास या संघटनेची भूमिका आहे. आज गाझा पट्टीत हमासचा कब्जा आहे आणि तिथूनच इस्रायलवर हल्ले होत आहेत. दुसरीकडे इस्रायलने गाझा पट्टीतून हमासला हद्दपार करण्याचा दावा केला आहे. इस्रायलवर हमासचा हल्ला हा अमेरिकेसाठी ९/११ सारखाच प्रसंग आहे. hamas-isreal-war हमासचे लढवय्ये इस्रायली सीमा चौक्यांवर आणि लष्करी तळांवर घुसून निरपराध नागरिकांची हत्या करीत होते. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद जगभर प्रसिद्ध आहे.
इस्रायली सुरक्षा कवच अभेद्य मानले जाते. असे असतानाही घडलेली ही घटना चर्चेची मोठी बाब बनली. या हल्ल्याची व्याप्ती आणि तीव्रतेने इस्रायलच्या विवेकबुद्धीला मोठा धक्का बसला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासच्या दहशतवादी हल्ल्याने आपल्यावर युद्ध लादले असून दीर्घकाळ चालणार आहे, असे जाहीर केले आहे. hamas-isreal-war इस्रायलवर हमासचा हल्ला गाझामधून झाला. या जागतिक दहशतवादी संघटनेची दहशत शिगेला पोहोचली आहे. दहशतवाद्यांनी लष्करी वाहने ताब्यात घेतली आणि लोकांचे अपहरण केले. महिलांना कपड्याने फास लावून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर इस्रायली सैन्य अनेक तास हमासच्या ताब्यात असलेले आपले क्षेत्र आणि इस्रायलमधील लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत राहिले. hamas-isreal-war इस्रायल-पॅलेस्टाईनचा मुद्दा व्यापक प्रादेशिक विभाजन रेषांमध्ये अडकला आहे. हमासवर इराण आणि लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाचे नियंत्रण आहे. हिजबुल्लाहने आधीच या लढ्यात उडी घेतली आहे. माऊंट डव्ह हल्ल्यामागे आपला हात असल्याचेही त्याने म्हटले आहे.
hamas-isreal-war इस्रायल, लेबनॉन आणि सीरिया या भागावर दावा करीत आहेत. हिजबुल्लाहनेही पॅलेस्टाईनच्या मोहिमेला पाठींबा देण्याचा पुनरुच्चार केला आहे. जागतिक समीकरणांवरही या घटनांचा परिणाम होईल. इस्रायलनेही जबलुरू भागात हिजबुल्लाहला प्रत्युत्तर दिले आहे. त्याच वेळी इजिप्त आणि कतारमध्ये इस्रायली पर्यटकांच्या हत्येच्या बातम्यांमुळे या भागातील पॅलेस्टिनी समर्थक शक्तींचा इस्रायलच्या विरोधातला प्रभाव सातत्याने वाढत असल्याचे अधोरेखित होते. याचा परिणाम जागतिक समीकरणांवर दिसून येईल. hamas-isreal-war या हल्ल्याद्वारे, हमासने पॅलेस्टाईन समस्येवर स्वतःला सर्वात मजबूत पक्ष म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या क्षेत्रातील उदयोन्मुख अमेरिकन रणनीतीदेखील रुळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बायडेन प्रशासनाने सौदी अरब आणि इस्रायलमध्ये रियाधला सुरक्षा हमी आणि आण्विक तंत्रज्ञान देण्यासह समेट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पश्चिम आशियामध्ये एक नवीन धोरणात्मक चौकट तयार होत असल्याचे दिसून आले.
या कराराच्या अंमलबजावणीमुळे इराण आणि हमासला धोका तयार झाला होता. त्यामुळे इस्रायलवर हल्ला करून हमासने त्या युतीला अनिश्चिततेमध्ये ढकलले आहे. आता इस्रायल ज्या पद्धतीने हमास आणि इतर दहशतवादी गटांवर हल्ले करत आहे, त्या दिशेने पुढे जाणे सौदी अरबला कठीण जाईल. hamas-isreal-war कारण इस्रायलच्या पाठीशी उभे राहिल्यास जनतेमध्ये संताप आणि असंतोष निर्माण होण्याचा धोका आहे. इस्त्रायली लष्कर आणि गुप्तचर संस्था जगात सर्वात सक्षम मानल्या जातात, हे आपण विसरता कामा नये. असे असूनही हमासच्या चौफेर हल्ल्याने त्यांची कमजोरी उघड झाली. यावरून नेहमीच युद्धाला तोंड देत असलेल्या देशांची नाजूक परिस्थितीही दिसून येते. इस्रायलने या आव्हानाला अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले पाहिजे की, ते जगासमोरील एक उदाहरण ठरेल.