भंडारा बसस्थानकावर संतापलेल्या प्रवाशांचा चक्काजाम

17 Oct 2023 19:45:42
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
Bhandara bus stand : येथील मुख्य बस स्थानकावरून एकीकडे शिवशाही व इतर लांब पल्ल्यांच्या गाड्या अधिक सोडण्यावर भर दिला जात असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्वाच्या असलेल्या लोकल लाल बसगाड्यांचे कुठेही नियोजन दिसत नाही. या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण भागात ये-जा करणाèया प्रवाशांची दररोज गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेकडो प्रवाशांनी आज 17 रोजी भंडारा बसस्थानक प्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी संपुर्ण बसगाड्या प्रवाशांनी अडवून धरल्याने व्यवस्थापकांची चांगलीच तारांबळ झाली. अखेर पोलिस प्रशासनाला मध्यस्थी करण्याची वेळ आल्याने वाहतुक सुरळीत होऊ शकली.
 

Bhandara bus stand 
Powered By Sangraha 9.0