श्रीरेणुका देवीच्या अखंड ज्योतीने वणीतील दुर्गा मंदिराचे भव्य लोकार्पण

    दिनांक :17-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
Renuka Devi : येथील दुर्गामाता मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून घटस्थापनेच्या दिवशी रेणुका मातेच्या अखंड ज्योतीने मंदिराचे लोकार्पण करून भक्तांसाठी भव्य मंदिर खुले करण्यात आले आहे. दरम्यान, अखंड ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी दुर्गामाता मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. येथील डॉ. आंबेडकर चौकातील नवशक्ती दुर्गामाता मंदिरात माहुरगड येथील महाराष्ट्रातील साडेतीन जागृत शक्तीपीठापैकी एक श्रीरेणुका देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करुन ती वणी नगरीत आणण्याचा निर्धार नवशक्ती दुर्गामाता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केला होता.

Renuka Devi 
 
त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या (Renuka Devi) नवरात्रात दुर्गामाता मंदिराचा अभिनव उपक‘म म्हणून माहुरगड येथील रेणुका मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून घटस्थापनेच्या मुहूर्तावर, 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता वणीत आल्यावर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या जल्लोषात या ज्योतयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ती अखंड ज्योत दुर्गामाता मंदिरात प्रवेश करून मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर ही अखंड ज्योत भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली.
 
 
ही अखंड ज्योत (Renuka Devi) आणण्यासाठी ज्योतयात्रेत समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्यासह दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल, स्वप्निल बिहारी, मारोती गोखरे या अखंड ज्योतयात्रेचे स्वागत करण्यासाठी वणीकर नागरिक मोठ्या सं‘येने उपस्थित होते.