हाँगकाँग,
China economy : जागतिक मागणी, चलनवाढीचा दबाव व कमकुवत मालमत्ता क्षेत्रामुळे चीनची अर्थव्यवस्था तिसर्या तिमाहीत मंदावली असून, ती 4.9 टक्क्यांवर घसरली आहे. जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जुलै-सप्टेंबर तिमाहीत 4.9 टक्क्यांनी वाढली. विश्लेषकांनी 4.5 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज मांडला होता, परंतु अधिकृत आकडेवारीनुसार, मागील तिमाहीतील 6.3 टक्क्यांच्या वाढीवरून ती मंदावली.
तिमाही आधारावर, एप्रिल ते जून या तिमाहीत 0.8 टक्के वाढीच्या तुलनेत तिसर्या तिमाहीत (China economy) अर्थव्यवस्था 1.3 टक्क्यांनी वाढली. अलीकडच्या काही महिन्यांत चीन सरकारने मालमत्ता क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नात पायाभूत सुविधांवरील खर्च, व्याजदरात कपात व गृहखरेदीवरील अंकुश कमी करणे यासह अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या आहे. निर्यात व आयात कमी होत आहेत, हे चीनच्या व्यापार डेटामध्ये दिसून आले. बीजिंगने यावर्षी पाच टक्के आर्थिक विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. चीन आपले उद्दिष्ट गाठण्याची शक्यता असली, तरी 2024 मध्ये ती वाढ 4.5 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.