बोकड चोरट्यांना चोवीस तासात अटक

02 Oct 2023 19:11:43
गोंदिया, 
thieves arrested तालुक्यातील रावणवाडी ते बालाघाट मार्गावरील मूरपार शिवारात बोकड चोरणार्‍या तीन आरोपींनी रावणवाडी पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेला बोकड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. मुरपार येथील मंगल मस्करे हे 30 सप्टेंबर रोजी बालाघाट-रावणवाडी मार्ग परिसरात शेळ्या चारत असताना तीन अज्ञात व्यक्ती एमएच 35, एएस 7902 क्रमांकाच्या दुचाकीने आपले व बोकड घेऊन पळ काढला. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
 
 
thieves arrested
 
दरम्यान, आरोपी व दुचाकीचा शोध घेत असताना रावणवाडी शिवारात तीन व्यक्ती बोकड विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी 1 ऑक्टोबर रोजी यश करोशिया (19, रा. काटी), शक्ती कुवर (19, रा. गोंदिया) व एका विधिसंघर्ष बालकाला शिरपूर येथून ताब्यात घेतले. thieves arrested त्यांच्याजवळून चोरलेला बोकड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पुढील तपास पोलिस हवालदार अरविंद चौधरी करित आहेत. ही कारवाई ठाणेदार पुरूषोत्तम अहेरकर, पोहवा रंजित बघेले, सुबोध बिसेन, पोना मलेवार यांनी केली.
Powered By Sangraha 9.0