गोंदिया,
thieves arrested तालुक्यातील रावणवाडी ते बालाघाट मार्गावरील मूरपार शिवारात बोकड चोरणार्या तीन आरोपींनी रावणवाडी पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेला बोकड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. मुरपार येथील मंगल मस्करे हे 30 सप्टेंबर रोजी बालाघाट-रावणवाडी मार्ग परिसरात शेळ्या चारत असताना तीन अज्ञात व्यक्ती एमएच 35, एएस 7902 क्रमांकाच्या दुचाकीने आपले व बोकड घेऊन पळ काढला. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, आरोपी व दुचाकीचा शोध घेत असताना रावणवाडी शिवारात तीन व्यक्ती बोकड विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी 1 ऑक्टोबर रोजी यश करोशिया (19, रा. काटी), शक्ती कुवर (19, रा. गोंदिया) व एका विधिसंघर्ष बालकाला शिरपूर येथून ताब्यात घेतले. thieves arrested त्यांच्याजवळून चोरलेला बोकड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पुढील तपास पोलिस हवालदार अरविंद चौधरी करित आहेत. ही कारवाई ठाणेदार पुरूषोत्तम अहेरकर, पोहवा रंजित बघेले, सुबोध बिसेन, पोना मलेवार यांनी केली.