प्रसिद्ध संगीतकार, गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन

    दिनांक :02-Oct-2023
Total Views |
पुणे, 
Kishor Kulkarni : ‘नादातूनी या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम’ या नाम गजरातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध संगीतकार व गायक किशोर कुलकर्णी यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. पं. यशवंतबुवा मराठे आणि महंमद हुसेन खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलेले किशोर कुलकर्णी यांना पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून सुगम संगीताचे मार्गदर्शन मिळाले.
 
Kishor Kulkarni
 
लता मंगेशकर यांचा त्यांना प्रदीर्घ सहवास लाभला. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम Kishor Kulkarni आणि शिवकल्याण राजा या कार्यक‘मात त्यांचा सहभाग होता तर, त्यांच्या रचनांवर आधारित ‘दिन तैसी रजनी’ या कार्यक्रमाचे ते संगीतकार आणि निर्माते होते. स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यावरील रचना कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केल्या होत्या. कवी ग्रेस यांच्या कविता स्वरबद्ध करून त्यावर आधारित ‘ग्रेसफुल’ या कार्यक‘माची निर्मिती त्यांनी केली होती. गेली काही वर्षे ते नवोदितांना संगीत मार्गदर्शन करत होते.