बालाजी मंदिर रस्त्यावरील मास विक्री बंद करण्यासाठी बेमुदत उपोषण

    दिनांक :02-Oct-2023
Total Views |
मेहकर,
Balaji Mandir road : मेहकरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या शारंगधर बालाजी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर उघड्यावर होत असलेली मास विक्री तसेच श्री क्षेत्र ओलांडेश्वर मंदिर समोर असलेली अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावी या मागणीसाठी शारंगधर बालाजी मंदिराचे विश्वस्त व भक्तांनी नगरपरिषद कार्यालय समोर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
 
Balaji Mandir road
 
स्थानिक शारंगधर Balaji Mandir road बालाजी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर उघडपणे मास विक्री होत असून दर्शनासाठी येणार्‍या जाणार्‍या भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या रस्त्यावरील अतिक्रमण व होत असलेली मास विक्री बंद करावी, तहसील चौक ते श्री बालाजी संस्थान या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे ,श्री बालाजी संस्थान व ओलांडेश्वर मंदिर या रस्त्यावरील असलेले ऑटो रिक्षा स्टॅन्ड व रस्त्यात उभे राहत असलेले वाहनावर कायमस्वरूपी कारवाई करून या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे,महात्मा फुले भाजी मार्केटचे पाच पैकी चार गेटवरील अतिक्रमण काढून नागरिकांसाठी मार्केटचा रस्ता मोकळा करण्यात यावा या मागण्या संदर्भात यापूर्वी नगरपरिषदेला भाविक भक्तांनी अनेक वेळा निवेदन दिले होते.
 
 
मात्र संबंधित अधिकार्‍यांनी या निवेदनाची कोणतीच दखल घेतली नसल्याने शेवटी Balaji Mandir road श्री शारंगधर बालाजी मंदिराचे विश्वस्त बबलू मुंदडा, हभप भागवत महाराज भिसे व सामाजिक कार्यकर्ते संतोष मलोसे हे दि. 2 ऑक्टोंबर पासुन बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सोबतच एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष अँड. संजय सदावर्ते, द्वारकादास शर्मा, विलास आखाडे हे भक्तगण बसले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.