शिलाँग,
Meghalaya earthquake : पूर्वेकडील मेघालय राज्यातील उत्तर गारो जिल्हयात 10 किमी खोलीवर आज सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 5.2 इतकी झाली असून, यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे भूकंपमापन केंद्राकडून सांगण्यात आले. (Meghalaya earthquake) भूकंपाचे केंद्र जिल्हा मुख्यालय रेसुबेलपारापासून तीन किमी अंतरावर होते. तीव्र धक्के शेजारी आसाम, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये जाणवल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राने जमिनीच्या आत वाढत्या दबावामुळे पुढील दिवसांत आणखी धक्के बसण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर, 24 तासांच्या आत 4.0 ते 4.2 तीव‘तेचे धक्के बसू शकतात, असेही म्हटले आहे.
हरयाणा, मध्यप्रदेशही हादरला
हरयाणा राज्यातील रोहतक (Meghalaya earthquake) आणि परिसरातील जमीन रविवारी रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरली. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रानुसार, भूकंपाचे केंद्र रोहतकपासून सात किमी खेडी साध गावात पाच किलोमीटर खोलीवर होते. याशिवाय मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात रविवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी चंदौली कला येथे पाच किमी खोलीवर जमिनीला हादरे बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी नोंदविण्यात आली.
पाकिस्तानला भीषण भूकंपाचा इशारा
इस्लामाबाद : (Meghalaya earthquake) पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताला पुढील 48 तासांत भीषण भूकंपाचा धोका असल्याचा इशारा डच संशोधक फ‘ँक हुगरबीट्स यांनी दिला आहे. या आधी त्यांनी तुर्कीये आणि सीरिया या दोन देशांतील मागील दिवसांतील भूकंपाबाबतचा अंदाज व्यक्त केला होता, हे विशेष.