23 दिवस, 35 लाख विवाह

20 Oct 2023 18:34:47
नवी दिल्ली, 
35 lakh marriages भारतात दिवाळीनंतर येणार्‍या प्रबोधिनी एकादशीनंतर विवाहाचा हंगाम सुरू होतो. देशाच्या विविध भागांत विवाह सोहळ्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या लग्नसराईत व्यापार्‍यांना मोठा व्यवसाय अपेक्षित आहे. आगामी लग्नसराईत मोठी विक‘ी करण्याची तयारी व्यापार्‍यांनी सुरू केली आहे. एका अहवालानुसार, 2023 मध्ये देशभरात 35 लाख विवाह होण्याची अपेक्षा आहे. देशभरात होणार्‍या 35 लाख विवाहांमध्ये सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो, जी आजपर्यंतची सर्वाधिक मोठी उलाढाल असेल, असे या अहवालात म्हटले आहे.
 
 
35 lakh marriages
 
कान्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया म्हणाले की, सीएआयटीच्या रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने अलिकडेच देशातील 20 प्रमुख शहरांमधील व्यापारी आणि सेवा प्रदात्यांविषयी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार, या हंगामात एकट्या दिल्लीत 3.5 लाखांहून अधिक विवाह होण्याची शक्यता आहे. या हंगामात दिल्लीत सुमारे एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. 35 lakh marriages गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास 32 लाख विवाह झाले होते. हे आहेत शुभ मुहूर्त कॅटच्या आध्यात्मिक आणि वैदिक ज्ञान समितीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य दुर्गेश तारे यांनी सांगितले की, नक्षत्रांच्या गणनेनुसार, 23 नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशीपासून विवाहाच्या तारखा सुरू होतील. नोव्हेंबरमध्ये 23, 24, 27, 28 आणि 29 हे शुभ मुहूर्त आहेत. डिसेंबर महिन्यात 3, 4, 7, 8, 9 आणि 15 तारीख विवाहासाठी शुभ आहेत. जानेवारीच्या मध्यापासून पुन्हा एकदा शुभ दिवस सुरू होतील. या लग्नसराईत सुमारे 6 लाख विवाहांमध्ये प्रति विवाह अंदाजे 3 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 10 लाख विवाहांमध्ये प्रतिविवाह सुमारे 6 ते 12 लाख रुपये खर्च येईल. 6 लाख विवाहांमध्ये प्रति विवाह 25 लाख रुपये खर्च होतील. तर 50 हजार विवाह सोहळे असे आहेत ज्यात 1 कोटी किंवा त्याहून अधिक खर्च करण्यात येणार आहे. या एक महिन्याच्या लग्नाच्या मोसमात बाजारपेठांमध्ये विवाह समारंभासंबंधी खरेदीतून सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होणार आहे. यानंतर 15 जानेवारीपासून पुन्हा एकदा लग्नसराई सुरू होणार आहे.
Powered By Sangraha 9.0