तभा वृत्तसेवा
सिहोरा,
Ayushman Bharat Card बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांसाठी आयुष्यमान भारत कार्ड विनामूल्य बनवून देण्याचा उपक्रम भाजपाचे किशोर राहांगडाले यांनी राबविला असून 20 ऑक्टोबर रोजी गोंदेखारी येथे शिबिर लावण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भाजपा तुमसर तालुका अध्यक्ष काशीराम टेंभरे यांचे हस्ते पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली असून याद्वारे नागरिकांच्या उपचारासाठी 5 लाख रुपये विम्याचा लाभ घेता येणार आहे.
याचा जास्तीत जास्त नागरिकांना Ayushman Bharat Card लाभ मिळावा याकरिता बपेरा जि. प. क्षेत्रातील देवसर्रा, सुकळी/नकूल, गोंडीटोला, देवरीदेव, बिनाखी, महालगाव, ब्राम्हणटोला, वारपिंडकेपार, सोंडया, गोंदेखारी, मोहाडी खापा, टेमनी, चांदपूर, मांगली, बपेरा व परिसरातील इतर गावातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन किशोर रहांगडाले यांनी केले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष गोवर्धन शेंडे, फकीरचंद बिसने, संतोष गौतम, अक्षय येले, संजय राणे व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.