नागपुर हिवाळी अधिवेशन 10 दिवसांत गुंडाळणार

-विधिमंडळ कामकाजाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

    दिनांक :21-Oct-2023
Total Views |
नागपूर, 
Nagpur winter session : येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते कामकाजाचे वेळापत्रक ठरले असून, हे अधिवेशन केवळ 10 दिवसांत गुंडाळण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. मात्र, हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंतच आहे. अर्थात् हे अधिवेशन दहा दिवसांत गुंडाळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते; मात्र या वर्षी अधिवेशन 20 डिसेंबर म्हणजे बुधवारी गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
Nagpur winter session
 
हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter session) 7 ते 20 डिसेंबर अशा दहा दिवसांच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. म्हणजे, 7 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या अधिवेशनाचे कामकाज 20 डिसेंबरपर्यंतच नमूद करण्यात आले आहे.
 
 
विदर्भात अधिवेशन दोन महिने चालवा : पटोले
हिवाळी अधिवेशन (Nagpur winter session) गुंडाळण्याच्या मुद्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे सरकार चालवत आहेत. विदर्भात हे अधिवेशन दोन महिने चालले पाहिजे, असे म्हणणारे आज सत्तेत आहेत. फडणवीस आज सत्तेत आहेत, ते विदर्भाचे आहेत. त्यांनी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे चालवले पाहिजे. हिवाळी अधिवेशन दोन महिने घेतले पाहिजे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
 
हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?
हिवाळी अधिवेशनात (Nagpur winter session) कोणते मुद्दे गाजणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. नाशिक-पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेले नुकसान याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुराच्या तडाख्याने नागरिकांचे तसेच पायाभूत सोयी सुविधांचे नुकसान झाले. यामुळे नागपूर शहर आणि जिल्ह्याला हिवाळी अधिवेशनात विशेष पॅकेज मिळेल, असे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले होते. परंतु, 10 हजारांच्या पलिकडे मदत मिळाली नसल्याचे पुरग्रस्तांचे म्हणणे आहे.