‘उडत्या' समस्येचा लक्ष्यभेद !

21 Oct 2023 16:51:19
रोखठोक
- दिनेश गुणे  
drugs-India-Youth डार्कनेस (अंधकार), डिस्ट्रक्शन (विध्वंस) आणि डिव्हॅस्टेशन (विनाश) हे अमली पदार्थांच्या नशेचे तीन ‘डी' आहेत. अमली पदार्थांचे व्यसन ही मानसिक, सामाजिक आणि वैद्यकीय समस्या असल्याने या समस्येकडे त्या दृष्टीनेच पाहावयास हवे आणि या समस्येच्या विळख्यात सापडलेल्या व्यसनाधीन व्यक्तीस त्याचा दोष न देता, या समस्येचे मूळ असलेल्या, अमली अवैध व्यापाराचे कंबरडे समूळ मोडून काढले पाहिजे. drugs-India-Youth याकरिता देशव्यापी मोहीम राबविण्याचे सुतोवाच करून, भारतात अमली पदार्थांचा व्यापार चालू देणार नाही आणि भारताच्या माध्यमातून अमली पदार्थांचा जगात कोठेही प्रसार होऊ देणार नाही असा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ डिसेंबर २०१४ या दिवशीच्या ‘मन की बात' कार्यक्रमातून बोलून दाखविला आणि गृहखात्याने अमली पदार्थांच्या तस्करी, व्यापार आणि वापर यांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली. drugs-India-Youth देशातील सर्व प्रमुख संस्था, विशेषतः अमली पदार्थ विरोधी विभागाने, अमली पदार्थांच्या विरोधात सुरू केलेल्या अभियानाला आणखी बळ देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने २०१९ मध्ये एनकॉर्ड (एनसीओआरडी)ची स्थापना केली आणि प्रत्येक राज्याच्या पोलिस दलामध्ये अमली पदार्थ विरोधी कृती (एएनटीएफ) दलाची स्थापना करण्यात आली.
 
 
 
drugs-India-Youth
 
 
अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि दुष्प्रभावांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर साहाय्यकारी व्यासपीठांच्या माध्यमातून युद्धस्तरीय अभियान सुरू झाले. २००६ ते २०१३ या सात वर्षांत देशभरातील विविध कारवायांत केवळ ७८६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. drugs-India-Youth नंतर अमली पदार्थांच्या विरोधातील लढाईला व्यापक रूप देण्यात आले. राज्य आणि सरकारच्या विविध यंत्रणांनी समन्वयाने या लढाईची आखणी केली आणि २०१४ नंतरच्या जवळपास आठ वर्षांत सुमारे तीस पट अधिक म्हणजेच २२ हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थांचा व्यापार करणाèया लोकांच्या विरोधात पूर्वीच्या तुलनेत १८० टक्के अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि भारताच्या अमली पदार्थमुक्ती मोहिमेची सरकारची कटिबद्धता स्पष्ट झाली. drugs-India-Youth जून २०२२ मध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा पुनर्वापर रोखण्यासाठी एक अभियान चालवण्यात आले आणि देशभरात जप्त करण्यात आलेले सुमारे सहा लाख किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमली पदार्थांच्या अवैध धंद्याबाबत सरकारकडे कोणतीही दयामाया नाही आणि सहिष्णुताशून्य कठोरपणाने ही मोहीम सुरू राहणार, याची देशातील जनतेला साक्ष पटली. धक्कादायक ...नशेच्या अंमलात हमासने केला नरसंहार !  
 
 
drugs-India-Youth अमली पदार्थांच्या अवैध धंद्यातून निर्माण होणारा काळा पैसा माफिया आणि दहशतवाद्यांच्या कारवायांकरिता पुरविला जातो आणि त्यांच्याशी लढताना देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील जवान धारातीर्थी पडतात. अप्रत्यक्षपणे, अमली पदार्थांचा व्यापार ज्यांच्या जिवावर फोफावतो, तो समाजातील व्यसनाधीन वर्गच आपल्या संरक्षणासाठी आणि देशातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिवाची बाजी लावणाèया जवानांच्या जिवावर उठलेला असतो. ईशान्य भारतात अमली पदार्थांची तस्करी ही मोठी समस्या आहे. यातून अनेकदा सुरक्षा यंत्रणा आणि तस्करी टोळ्यांमध्ये संघर्षही होत असतात. drugs-India-Youth गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने या टोळ्यांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली. ईशान्य भारतातून राजस्थानला अफूचा मोठा साठा चोरट्या मार्गाने रवाना होणार असल्याची पक्की खबर या पथकास मिळाली आणि टोळ्यांच्या मागावर असलेल्या सतर्क यंत्रणेने कंबर कसली. एकाच मोहिमेत अमली पदार्थांची आंतरराज्य तस्करी आणि व्यापार करणाèया टोळ्यांचे कंबरडे या पथकाने मोडले. राजस्थानात पाठविण्यात येणाऱ्या अफूचा सुमारे १४ कोटी रुपये किमतीचा साठाही हस्तगत करण्यात आला आणि या पथकाच्या मोहिमेसही वेग आला. drugs-India-Youth अमली पदार्थांची तस्करी करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि या धंद्यात गुंतलेल्या बड्या माशांना जाळ्यात ओढण्याकरिता देशव्यापी कारवाया सुरू झाल्या. या पाठपुराव्यास गेल्या मार्च महिन्यात मोठे यश आलेच, पण या धंद्यात गुरफटलेल्यांची गय नाही, याचा सज्जड संदेशही देशभर दिला गेला.
 
 23 दिवस, 35 लाख विवाह
देशातील सर्वांत मोठ्या गांजा तस्करी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या पाच आरोपींना रायपूरच्या अमली व मादक पदार्थ न्यायालयाने २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि दोन लाखांचा दंडही ठोठावला. अमली पदार्थांच्या अवैध धंद्याबाबत शून्य सहनशीलता धोरणाने गेल्या काही महिन्यांत अनेकांची झोप उडाली आहे आणि या धंद्याच्या नाड्या आवळण्यासाठी देश व राज्यांतील यंत्रणांनी हातात हात घालून मोहिमा तीव्र केल्या आहेत. drugs-India-Youth त्याचे परिणामही दिसू लागलेत. तीन महिन्यांपूर्वी, १७ जुलै रोजी तब्बल एक लाख ४४ हजार किलो अमली पदार्थांचा जप्त करण्यात आलेला साठा नष्ट करण्यात आला आणि या मोहिमेने देशातील ऐतिहासिक टप्पा गाठला. या धंद्यात गुंतलेल्या १२ हजार कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल या मोहिमेअंतर्गत मातीमोल झाला आणि या ऐतिहासिक कामगिरीमुळे तस्करी टोळ्यांचे कंबरडे मोडले. अमली पदार्थमुक्त भारत ही केवळ एका भाषणातील घोषणा नव्हती, तर त्या घोषणेचा प्रत्येक शब्द कृतीत उतरताना देशाने पाहिला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबईत महसूल गुप्तचर पथकाने सुमारे दीड हजार कोटींचे जवळपास दोन क्विंटल अमली पदार्थ फळांच्या एका ट्रकमधून हस्तगत केले आणि न्हावा शेवा बंदरातून सुमारे पाचशे कोटींचे कोकेनही जप्त करण्यात आले. drugs-India-Youth सुमारे दोन महिन्यांपूर्वी, ऑगस्ट २०२३ मध्ये आदिस अबाबा येथून एक भारतीय प्रवासी मुंबईच्या विमानतळावर उतरला आणि महसूल गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली. सापळा रचलेला होताच. हा प्रवासी अलगद यंत्रणेच्या सापळ्यात सापडला आणि सुमारे दीड किलो वजनाचा कोकेन या अमली पदार्थाचा साठा त्या प्रवाशाकडून हस्तगत करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे १५ कोटी एवढी होती.
 
 
भारताच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेस मिळणाऱ्या या यशाचे श्रेय सरकारच्या कटिबद्धतेस द्यावेच लागेल. गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध ठिकाणी अमली पदार्थांचे प्रचंड साठे उद्ध्वस्त करण्यात आल्याने, अनेकांच्या भुवया विस्फारल्या. या धंद्याची आवक अचानक कशी वाढली, असे निरर्थक सवाल सुरू झाले. वास्तव मात्र वेगळेच होते. drugs-India-Youth हा धंदा अचानक फोफावलेला नाही. गेल्या अनेक दशकांपासून सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी भारतात चालत आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरात सापडलेला तीन हजार किलोचा अमली पदार्थांचा साठा अमली पदार्थविरोधी मोहिमेत हस्तगत करण्यात आला आणि देश हादरला. या धंद्याने देशभर आपले बस्तान बसविले होते आणि अमली पदार्थांच्या विळख्यात सापडून तरुणांच्या पिढ्या अक्षरशः बरबाद होत होत्या. drugs-India-Youth मोदी सरकार सत्तेवर येण्याआधीच्या दहा वर्षांत केवळ सातशे-आठशे किलो अमली पदार्थ जप्त होत होते आणि मोदी सरकार सत्तेवर येताच हा आकडा तिप्पटीहून अधिक झाला. कारवायांचा वेग वाढला आणि कोणतीही दयामाया न दाखविला या धंद्यातील टोळ्या उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू झाले, हा याचा स्पष्ट अर्थ आहे. अगदी दहाबारा दिवसांपूर्वी, मुंबईतील एका तस्करी टोळीचा छडा लावण्यात महसूल गुप्तचर यंत्रणेस यश आले. या अवैध धंद्यात महिलांचा सहभाग असतो, हे आता उघडच झालेले आहे.
 
 
नाशिकच्या तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या ललित पाटीलच्या धंद्यातील दोन महिलांची भूमिका सध्या गाजते आहे. गेल्या १३ तारखेस महसूल गुप्तचर खात्याच्या मुंबई शाखेने महिलांचा सहभाग असलेल्या एका टोळीचा अत्यंत कौशल्याने छडा लावला आणि या व्यापारातील परदेशी सहभागाचे धागेदोरेही उघड होऊ लागले. परदेशी माध्यमातून, सॅनिटरी पॅड आणि गुप्तांगातून लपवून अमली पदार्थांची चोरटी आयात होत असल्याची खबर या पथकास मिळाली होती. त्यामुळे पाळत ठेवून या पथकाने या टोळीला जाळ्यात पकडले. drugs-India-Youth याआधी हीच टोळी मोठ्या कल्पकतेने प्रवासी सामानात लपवून अमली पदार्थांची वाहतूक करत असल्याचेही त्यानंतरच्या तपासात उघड झाले. महाराष्ट्रात या मोहिमेतून या अवैध धंद्याभोवतीचा फास अधिकच आवळला गेला आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांभोवती अमली पदार्थांच्या व्यापाराचा घट्ट विळखा असल्याचे उघड झाल्याने व शाळकरी विद्यार्थ्यांना या व्यसनात गुरफटविण्याचे कारस्थानही वेगवेगळ्या घटनांतून स्पष्ट होऊ लागले आहे. शाळांच्या परिसरात फिरणारे दलाल आणि लहानमोठ्या दुकानांत नशिले पदार्थ मिळत असल्याचे दिसून आल्यावर मुंबईतील एका उपनगरातील पालकांत प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले होते. मुलांच्या दप्तरातच असे काही अमली पदार्थ आढळून आल्याने या मुलांच्या भविष्यावरच त्या ‘तीन डी'चे सावट पसरल्याने पालकवर्ग आक्रमक झाला होता. drugs-India-Youth पुण्यासारख्या शहरात या धंद्याविरोधातील गेल्या दहा वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई अलिकडेच करण्यात आली.
 
 
गेल्या दशकभरातील पहिल्या पाच-सात वर्षांत जेवढे अमली पदार्थांचे साठे जप्त करण्यात आले, तेवढेच साठे गेल्या सात महिन्यांत जप्त करण्यात आले आणि पिढ्यांना बरबाद करणाऱ्या या धंद्याची पाळेमुळे किती वेगाने पसरत आहेत, याचे प्रत्यंतर आले. गेल्या जानेवारी ते ऑगस्ट या जेमतेम आठ महिन्यांत एकट्या पुण्यातून जवळपास ११ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि या धंद्याने प्रगतीचे नवे टप्पे गाठल्याचेही दिसून येऊ लागले. काही वर्षांपूर्वी पुण्यात अफू, गांजा, चरस आदी अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळ्या आता कोकेन, एलएसडी, एमडी, मशरूम, हशीश तेल आदी आंतरराष्ट्रीय बाजारातील अमली पदार्थांचीही आयात करू लागल्याचे या कारवाईवरून दिसून आले. drugs-India-Youth चार दिवसांपूर्वी मुंबईत वांद्रे येथे अमली पदार्थविरोधी पथकाने सुमारे सव्वा कोटींचा उच्च प्रतीचा गांजा व काही अमली पदार्थ जप्त करून चार जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडलेल्या पिढीच्या चिंतेने ग्रासलेल्या पालकांच्या पिढीला अशा व्यापाराचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या धडक कारवायांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेला पुण्याच्या ससून इस्पितळाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाचा एक किलोहून अधिक साठा हस्तगत केला आणि ललित पाटील या कुख्यात अमली पदार्थ तस्कराचे प्रकरण पेटले. drugs-India-Youth नाशिकमधील अमली पदार्थांचा एक कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केला आणि नाशिक हे अमली पदार्थांचे मोठे केंद्र असल्याचे स्पष्ट होऊ लागले.
 
 
ससूनच्या प्रवेशद्वारावरील त्या कारवाईनंतर लगेचच ललित पाटील रुग्णालयातून पळून गेल्याने या प्रकरणास नवे रंग मिळू लागले. पुण्यातून पळून गेलेला ललित पाटील चाळीसगाव गाठतो, तेथून धुळ्यास जाऊन भाड्याच्या वाहनातून पळ काढतो व अखेरीस कर्नाटकातील बंगळुरूजवळील एका गावामध्ये आश्रय घेऊन लपून राहतो, हे कथानक समोर येत असतानाच आता त्याला राजकीय रंग देण्याचे प्रयत्नही सुरू झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या खुलाशामुळे या प्रकरणातील राजकारणाचे धागेदोरे उघड होण्याचे संकेतही मिळू लागले. व ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा नाशिकचा पदाधिकारी होता आणि १० नोव्हेंबर २०२० मध्ये त्याला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक झाल्यानंतर लगेचच पुण्याच्या ससून इस्पितळात दाखल करण्यात आल्याने त्याची चौकशीदेखील झाली नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्याच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे अर्जदेखील करण्यात आला नाही, त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि हा आरोपी ससूनमध्ये मुक्काम ठोकून त्याला पाठीशी घालण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किंवा गृहमंत्र्यांनी दबाव आणला का असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. drugs-India-Youth
 
 
 
ललित पाटील प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अमली पदार्थांच्या समस्येचा एक नवा कंगोरा आता समोर येणार आहे. फडणवीस यांनी गेल्या बुधवारी तसे स्पष्ट संकेतही दिले. ससून रुग्णालयातून पलायन करून राज्याबाहेर गेलेल्या ललित पाटीलला कर्नाटकातून अटक केली आणि आता या तस्करीचे एक मोठे षडयंत्र उघड होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. drugs-India-Youth यातून जे काही समोर येईल, त्यापैकी कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला आहे. एका बाजूला देशभर अमली पदार्थमुक्तीचे नारे घुमत आहेत, देशभरातील यंत्रणा अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात लढाईकरिता सज्ज झाल्या आहेत, पंतप्रधानांपासून सामान्य जनतेपर्यंत प्रत्येकास या समस्येच्या चिंतेने ग्रासले आहे आणि दुसरीकडे मात्र, या धंद्याच्या राजकीय संरक्षणावरून सवाल जवाब झडू लागले आहेत. म्हणूनच, ही मोहीम सोपी नाही. drugs-India-Youth केवळ सरकारी यंत्रणांचा सहभाग ही समस्या सोडविण्यासाठी पुरेसादेखील नाही. याची पाळेमुळे खणून काढावयास हवीत. अन्यथा या मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैद्यकीय समस्येतून अंधकार, विनाश आणि विध्वंस अटळ ठरेल.
Powered By Sangraha 9.0