आरक्षण घुसखोरी विरोधात अन्न व जलत्याग उपोषण

२५ ऑटोबर पासून पोहरादेवी येथे सुरूवात

    दिनांक :23-Oct-2023
Total Views |
मानोरा,
hunger strike राज्यच नव्हे तर संपूर्ण भारतातील जवळपास सगळ्याच राज्यात कमी अधिक प्रमाणात संवैधानिक आरक्षणाची समस्या प्रचंड प्रमाणात उदयास येत असून, घटनेने ज्या काही मूळ मागासवर्गीयांना आरक्षणाचे लाभ दिलेले आहे त्या लाभाचे वाटेकरी काही शूद्र मनोवृत्तीचे लोक धनबळाच्या आधारे घुसखोरी करीत असल्याचे उघड होत आहे. मिळालेल्या आरक्षणाचा गैरफायदा दुसरेच घेत असल्याने मूळ मागासवर्गीयांच्या आरक्षणावर गदा येत असल्यामूळे या परिस्थितीला थांबविण्यासाठी व राज्य शासनाला जागे करण्यासाठी भटके विमुक्त प्रवर्गातील घुसखोरीच्या विरोधात तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे २५ ऑटोबर पासून अन्न व जलत्याग उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
 
 
hunger strike
 
पोहरादेवी येथे भटके विमुक्त प्रवर्गातील समाज बांधवांची १९ ऑटोबर रोजी झालेल्या सहविचार सभेमध्ये राजपूत भामटा या भटके विमुक्त प्रवर्गातील जाती समूहाच्या नाम सदृश्यतेचा गैरफायदा राजपूत समाजातील असंख्य धनदांडगे शिक्षण आणि शासकीय रोजगारासाठी घेत असल्याचे पुराव्यानिशी उघड झाल्याच्या गंभीर बाबीवर संताप व्यक्त करण्यात आला. राज्यात अज्ञात ५६८ बनावट जात व जात पडताळणी धारकांवर तथा यांना बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी मदत करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे तातडीने दाखल करण्यात यावे. hunger strike विमुक्त जाती भटया जमाती प्रवर्गातील घुसखोरी समूळ उघड करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मुख्य व आणखीही काही मागणीसाठी सातत्याने मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करणारे राजेश राठोड, श्याम राठोड, अमोल राठोड आणि सचिन राठोड विमुक्त जाती भटके जमाती समाज बांधवांच्या वतीने तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील जगदंबा देवी व संत बामनलाल महाराज मंदिर परिसरामध्ये उपोषण प्रारंभ करणार आहे.