देऊळगाव राजा,
Shri Balaji Mandir : विदर्भ व मराठवाडाचा प्रति तिरुपती बालाजी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या देऊळगाव राजाशहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांचा 380 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला अश्विन मंडप उत्सवास दि. 22 ऑक्टोबर रोजी श्री बालाजी मंदीरा समोर 21 महाकाय लाटा व 42 मंडपाचे अच्छादन परंपारीक मानकरी व हजारो बालाजी भक्तांनी केले .लाटा मंडप उत्सवास प्रारंभ झाला असून हा उत्सव दहा दिवस चालणार आहे दि. एक नोव्हेंबर रोजी सूर्योदय ललित होऊन अश्विन उत्सवाची सांगता होईल.
380 वर्षाची परंपरा असलेल्या (Shri Balaji Mandir) श्री बालाजी महाराजांच्या अश्विन उत्सवात घटस्थापने पासून प्रारंभ झाला आहे . श्री बालाजी मंदीरा समोर लाटा व मंडप अच्छादन करण्याची परंपरा आहे . या उत्सवात विवीध समाज व जातींना परंपरे प्रमाणे सेवा करण्याचा मान आहे.सकाळी ठीक नऊ वाजता श्री संस्थान समोर मानकरी माळी समाजाने लाकडाच्या 32 फुटी सागवाणी लाटा व 42 मंडवाची बांधनी केली त्यानंतर ब्राम्हण -मराठा -लोहार -सुतार - शिंपी - तेली - जैन - चांभार - मुस्लीम - यांच्यासह विवीध समाजाच्या मानकरी यांनी आपआपले परंपरेप्रमाणे असलेले कार्य पूर्ण केले .
दुपारी 2 वाजता (Shri Balaji Mandir) श्री मंदीरासमोर हजारो बालाजी भक्तांच्या उपस्थीतीत लाटा मंडप उभारण्यास सुरुवात झाली . घंटा नाद व नगार खाण्यातील नगाराचे गजरात लाटा उभारणीस सुरुवात झाली .श्री बालाजी संस्थान तर्फे नाराळाचा वर्षाव लाटावर करण्यात आला . तसेच नवसकरी बालाजी भक्तांनीही नारळाचा वर्षाव केला . नारळाचा प्रसाद घेण्यासाठी एकच झुंबळ उडाली .बोल बालासाहेब की जय लक्ष्मी रमण गोविंदा च्या गरजा मधे दुपारी 2 ते 7 वाजे पर्यंत 21 लाटा व 42 मंडप हे एकाच नाड्यावर उभारणी मंदीरा समोर करण्यात आली . नाड्याचा 1 भाग संस्थान समोरील दगडी गरुड मूर्ती व दुसरा भाग दगडी हनुमान मूर्तीला बांधण्यात आला . या नाड्यावर लाटा मंडप बांधण्यात आले जैन समाजाने लाटावर ध्वज बांधले मुस्लीम बांधवांनी नगारे वाजवले .
श्री मंदीरात ब्राम्हण Shri Balaji Mandir व पुजारी वृंदानी महापूजा व महाआरती केली . श्री संस्थान तर्फे मानकरी यांचा मान करण्यात आला .हजारो बालाजी भक्तांच्या साक्षीने श्री बालाजी महाराज यांचा अधिन लाटा मंडप उत्सवास प्रारंभ झाला . 10 दिवस हे मंडप मंदीरा समोर राहणार असून दि 1 नव्हेंबर रोजी सकाळी सुर्योदयी लळीत होईल. दसर्याला मध्यरात्री श्री बालाजी महाराजांची पालखी ग्राम प्रदक्षणे साठी निघणार आहे. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता प्रशासकीय अधीकारी यांची उपस्थीती होती