तभा वृत्तसेवा
भंडारा,
Mahaarti वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने अत्यंत कमी असलेला भंडारा जिल्हा हा भंडारा जिल्हा वारकरी संप्रदायाच्या विचारांनी सुसज्ज व्हावा याकरिता ह.भ.प.विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपोर यांनी प्रचार दौरा केला. या प्रचार दौèयात त्यांनी एकूण 35 गावांमध्ये साप्ताहिक महाआरती सुरू केली. या गावांचा आदर्श घेऊन आता 70 गावांमध्ये साप्ताहिक महाआरती सुरू झाली. ‘यारे यारे लहान थोरें, याती भलत्या नारीनर’ असे म्हणत सगळ्यांना आपलस करणारा वारकरी संप्रदायात यावं असे आव्हान महाराजांनी केले.
गाव तेथे हरीपाठ, काकडा आरती, दशमी दिंडी, एकादशी व्रत, तुळशीचे व गायीचे महत्त्व, आईवडिलांची सेवा, पूजन व बाल सुसंस्कार शिबिराचे महत्त्व ह.भ.प.संजयजी महाराज पाचपोर यांनी पटवून दिले. मंदिर जीर्णोद्धार व देव, देश, धर्म अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या निरपेक्ष कार्याकडे पाहून डॉ.संजय एकापुरे यांनी उदात्त मनाने दत्त मंदिर निमगाव येथील जागा वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुकूल उभारणीसाठी दान दिली.Mahaarti तसेच संस्थेला बांधकामासाठी जास्तीत जास्त सहकार्य केल्या जाईल व मित्र परिवाराला सेवा कार्यात जोडले जाईल असे सांगितले. सर्व उपक्रमाकरिता भंडारा वारकरी मंडळाचे मोठे सहकार्य लाभले.