Zari's Center School तालुक्यातील झरी येथील केंद्र शाळा एक शिक्षक व एक स्वयंसेवक यांच्या भरोशावर असून तेथील शिक्षक राकेश आईटवार सतत गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असल्याची बाब विलास पोयाम यांनी उघडकीस आणली. झरी ही केंद्र शाळा असून पूर्वी वर्ग एक ते सात वर्ग होते कालांतराने विद्यार्थी सं‘या कमी असल्यामुळे आज रोजी वर्ग 1 ते 4 मध्ये विद्यार्थी सं‘या 34 असून त्याकरता एक शिक्षक व एक स्वयंसेवक आहे. येथील शिक्षक राकेश आईटवार यांचेकडे बीएलओचा सुद्धा प्रभार आहे. बीएलओचे काम हे नेहमी राहत नाही परंतु येथील शिक्षक मात्र नेहमी गैरहजर राहत असल्याची ओरड पालकांमध्ये दिसून येत आहे.
वर्ग एक ते चारच्या विद्यार्थ्यांकरता एकच शिक्षक असून वर्ग एक ते चारचे विद्यार्थी एकाच खोलीमध्ये बसून असल्याचे चित्र दिसून येत आहे. झरी येथील शाळेचा परिसर अस्वच्छ असून तेथील स्वच्छालय व इमारत जीर्ण अवस्थेत आहेत. Zari's Center School परिसर झाडे व वेलीने व्यापलेला असून तिथे स्वच्छता नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी सं‘या कमी असून सुद्धा शिक्षकांची संख्या मात्र जास्त दिसून येत आहे. गटशिक्षण अधिकार्यांनी या केंद्रशाळेकडे लक्ष देऊन शिक्षकांची व्यवस्था करून शैक्षणिक दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष देण्याची मागणी विलास पोयाम यांनी केली आहे.