अमृत कलश यात्रा मुंबईसाठी रवाना

जिल्हाधिकार्‍यांनी दाखविली हिरवी झेंडी

    दिनांक :25-Oct-2023
Total Views |
वाशीम, 
Amrit Kalash Yatra माझी माती माझा देश या अभियानातंर्गत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अमृत सरोवर, जलकुंभ,तिरंगा यात्रा, स्वच्छता प्रतिज्ञा, वृक्षारोपण, अमृत सरोवराच्या ठिकाणी मुलांसाठी विविध स्पर्धा, अमृत सरोवराच्या ठिकाणी ग्रामीण खेळांच्या स्पर्धांसह आयोजन करण्यात आले.
 

Amrit Kalash Yatra 
 
१७ ऑटोबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय कलश एकत्रीकरणाचा कार्यक्रम, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनएसएस,एनसीसी, एनवायके, भारत स्काऊट गाईड्स, अंगणवाडी कर्मचारी आणि इतर युवक स्वयंसेवक कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाला सुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २५ ऑटोबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा तालुयांचे ६ व नगरपालीका प्रशासनाचा १ असे एकूण ७ अमृत कलश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मुंबईसाठी रवाना करण्यात आले. यावेळी जिप मुकाअ वसुमना पंत, उप मुकाअ दिगंबर लोखंडे, मुख्याधिकारी पंकज सोनोने, गटविकास अधिकारी रवी सोनुने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Amrit Kalash Yatra नेहरू युवा केंद्राचे १२ स्वयंसेवक, जि.प.२ कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील २ कर्मचारी जिल्ह्यातील प्रत्येक न.प. क्षेत्रातून गोळा केलेल्या माती व तांदूळाने भरलेले कलश दिल्ली येथे पोहचविणार आहेत.त्यांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व उपस्थितांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. हे स्वयंसेवक २५ ऑटोबर रोजी मुंबईसाठी रवाना झाले असून, २७ ऑटोबर रोजी सायंकाळी मुंबईवरून दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हापरिषद अधिकारी व कर्मचारी, न. प. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.