प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आशा वर्कर्स आक्रमक

पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    दिनांक :25-Oct-2023
Total Views |
कारंजा लाड, 
Asha workers आशा स्वयंसेविकांना अभासी कामे करण्याची, लसीकरणाची, आभा आयडी कार्ड काढण्याची व इतर कामे करण्याची सक्ती केल्या जात असल्याने मागील काही दिवसांपासून आशा स्वयंसेविका आक्रमक झाल्या असून, गेल्या १६ ऑटोबर पासून त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे, याच अनुषंगाने २३ ऑटोबरला कारंजा पंचायत समिती कार्यालयासमोर कारंजा तालुयातील आशा स्वयंसेविकांनी धरणे आंदोलन केले.
 

Aasha Workers 
 
शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानात ७० हजार आशा स्वयंसेविका कार्यरत असून, आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला मिळतो, आशा स्वयंसेविका या आरोग्याचे महत्त्वाचे काम करीत असून, आरोग्य विभागाचा कणा आहे. त्यामुळे शासनाच्या आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचण्यात आशा स्वयंसेविकाचा मोलाचा वाटा आहे, तरीही शासनाकडून मात्र त्यांना दुर्लक्षित केल्या जात असल्याने त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.Asha workers संपाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फॉर्म अभासी करणे, लसीकरणाची अभासी माहिती भरणे, आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची केवायसी करणे, आभा आयडी कार्ड काढून ते केंद्र शासनाच्या विविध आरोग्य पोर्टलवर सेडिंग करणे आणि एनसीडी अंतर्गत सी बँक फॉर्म अभासी करणे, ही कामे करावी लागतात. त्यामुळे ही कामे बंद करण्यात यावी तसेच आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू करावे व केंद्र शासनाकडून मोबदल्यात वाढ मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या ठेवण्यात आल्या आहे. या मागण्यांचे निवेदन कारंजा पंचायत समिती सभापती मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.