काश्मीरमध्ये 35 वर्षांनंतर काढण्यात आली मिरवणूक

25 Oct 2023 15:16:50
जम्मू,  
Dussehra in Kashmir मंगळवारी देशभरात दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जम्मू-काश्मीरमध्येही दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये दसरा साजरा करणे हे केंद्रशासित प्रदेश विकासाच्या दृष्टीने लक्षणीय प्रगती करत असून तेथे शांतता असल्याचे दर्शवत आहे.
 
Dussehra in Kashmir
 
काश्मीरमध्ये शेकडो काश्मिरी पंडित आणि हिंदूंनी दसरा धार्मिक उत्साहात साजरा केला. यावेळी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. त्याचवेळी 35 वर्षांनंतर दसऱ्याच्या दिवशी इंदिरा नगरच्या शिवमंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. खोऱ्यातील दहशतवादामुळे अनेक वर्षांपासून दसऱ्याचा सण साजरा होत नव्हता. मंगळवारी सायंकाळी फटाके व पुतळा दहनाचा विधी पाहण्यासाठी खोऱ्यातील विविध भागातील पुरुष, महिला आणि लहान मुलांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. Dussehra in Kashmir वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात, मंगळवारी देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. रावण, त्याचा मुलगा मेघनाद आणि भाऊ कुंभकर्ण यांच्या  पुतळ्यांचे देशाच्या विविध भागांमध्ये दहन करण्यात आले आणि या कार्यक्रमांना सामान्य लोक तसेच राजकीय नेते उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर अनेक नेत्यांनी दसरा उत्सव साजरा करण्यासाठी दिल्लीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. राष्ट्रीय राजधानी द्वारका येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीयवाद आणि प्रादेशिकतेच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना संपवण्याचे आवाहन केले.
Powered By Sangraha 9.0