नीलेश राणेंनी बदलला राजकीय निवृत्तीचा निर्णय

    दिनांक :25-Oct-2023
Total Views |
मुंबई, 
Nilesh Rane : माजी खासदार नीलेश राणे यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय चोवीस तासांत मागे घेतला. भाजपाचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी नीलेश राणे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे नीलेश राणे यांनी सकि‘य राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नीलेश राणे यांची चर्चा झाली. त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि नीलेश राणे यांनी मिळून पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यानुसार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपला निर्णय बदलत, राजकारणात सकि‘य राहण्याची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
Nilesh Rane
 
नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करीत आपण अचानक राजकारणातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे नीलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नीलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय चोवीस तासांमध्ये मागे घेतला. नीलेश राणेंच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाण म्हणाले, नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट केल्यानंतर नेमके काय घडले हे कळत नव्हते. आम्ही याबाबत नारायण राणे यांच्यासोबत आणि नंतर फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. काम करात असताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, ही सर्वांची भावना आहे.