नागपूर,
Railway waiting hall : मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आता सर्वसुविधायुक्त असे नवीन अप्पर क्लास वेटिंग हॉल तयार करण्यात आले आहे. त्या हॉलचे उद्घाटन प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले. उच्च श्रेणीतील वेटिंग हॉलमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने आलिशान अर्गोनॉमिकली डिझाइन केलेले सोफे प्रवाशांना आराम करण्यासाठी आहे. नवीन हॉल पूर्णत: वातानुकूलित असून प्रतीक्षा करणार्या प्रवाशांना शांत झोप घेता येणार आहे. नव्या वेटिंग हॉलमध्ये 74 प्रवाशांसाठी आसनव्यवस्था आहे. यापूर्वी 61 आसनाची क्षमता होती. आता 135 प्रवासी एकाच वेळी या प्रीमियम सुविधेचा आनंद घेऊ शकतात.
स्त्रिया आणि पुरुषांसाठी हाय-टेक टॉयलेट्स असून प्रतिक्षालयात ट्रेन इंडिकेटर बोर्डसह माहिती दिल्या जाते. Railway waiting hall ट्रेनचे आगमन आणि निर्गमन यासंबंधी वेळेवर आणि अचूक माहिती येथे प्रवाशांना मिळते. याशिवाय ट्रेन अॅट अ ग्लान्स’ विभाग असल्याने प्रवाशांना ट्रेनचे वेळापत्रक आणि इतर सेवांबद्दल महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिल्या जाते. अप्पर क्लास वेटिंग हॉलच्या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, राजेश चिखले, अभिषेक पासवान, महेश कुमार व प्रवासी उपस्थित होते.