श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव समितीचा पुढाकार
४३ वर्षाची वत्सगुल्म नगरीची सामाजीक परंपरा
वाशीम,
Ravana Dahan दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव समितीच्या वतीने रावण दहन मैदान शुक्रवारपेठ वाशीम येथे दसरा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अशोक हेडा होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार किरण सरनाईक, माजी आमदार विजय जाधव, भाजपा लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे, जुगलकिशोर कोठारी, भानुप्रतापसिह ठाकूर, मिठूलाल शर्मा, माजी नगरसेवक राहुल तूपसांडे, दसरा महोत्सव समिती चे अध्यक्ष निलेश जैस्वाल आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम, सीता माता, बजरंगबली व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी जय श्री राम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. फटायांचा आतिषबाजीने कार्यक्रमाची शोभा वाढविली. Ravana Dahan सूत्रसंचालन व आभार सुशील भिमजियाणी यांनी मानले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी नारायण बत्तुलवार व बंडू मारशेटवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.