पोहरादेवी येथे अन्न व जलत्याग आंदोलन

    दिनांक :26-Oct-2023
Total Views |
मानोरा, 
movement at Pohradevi पोहरादेवी येथील संत बामणलाल महाराज मंदीर परिसरात विमुक्त जाती अ प्रवर्गात अनधिकृत बनावट कागदपत्रांच्या आधारे बळावलेली बोगस घुसखोरी थांबवून बनावट जात व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणार्‍या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी, या मागणीसाठी २५ ऑटोंबर पासून अन्न व जलत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
 
 
movement at Pohradevi
 
अन्न व जलत्याग आंदोलनाला सचिन राठोड, राजेश राठोड, श्याम राठोड व अमोल राठोड हे चार आंदोलनकर्ते बसले असून, शासनाला निवेदनाद्वारे कळविले आहे की, विमुक्त जाती अ प्रवर्गात मागील कित्येक वर्षांपासून अनधिकृत बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस घुसखोरी सुरू आहे. movement at Pohradevi ही सुरू असलेली बेकायदेशीर व असंविधानिक घुसखोरी थांबविण्यात यावी, ५६८ बनावट जात व जात पडताळणी प्रमाणपत्र धारण करणार्‍या आणि यांना बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मदत करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यावर कार्यवाही करावी, असे निवेदन शासनाला पाठवून आंदोलनाला सुरूवात केली आहे.या आंदोलनाला पहिल्या दिवशी सुनिल महाराज, अभा तांडा सुधार समितीचे नामा जाधव, डॉ.श्याम जाधव, डॉ.सुभाष राठोड, व राज्याच्या विविध भागातील नागरिकांनी उपस्थित राहून अन्न व जलत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला.