फर्निचर दुकानाचे मालक ते 70 हजार वारकर्‍यांना मदत करणारे कीर्तनकार!

26 Oct 2023 18:11:29
मुंबई, 
Baba Maharaj Satarkar : बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा असून, त्यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. मात्र, फार कमी लोकांना बाबा माहाराज सातारकरांच्या जीवनप्रवासाबद्दल ठाऊक आहे. बाबा महाराज सातारकारांनी केवळ किर्तनकार म्हणून काम केले नाही, तर या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणेचेही काम केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबा महाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकर परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी त्यांनी चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचे शिष्य झाले.
 
Baba Maharaj Satarkar
 

-1950 ते 1954 या कालावधीमध्ये (Baba Maharaj Satarkar) बाबामहाराजांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, पुढे परमार्थामध्ये स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय करीत बाबा महाराजांनी हा व्यवसाय बंद केला.
 
- सुमारे 150 वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबामहाराज यांच्याकडे 80 वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी होण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे 100 वर्षे राखली.
 
-आप्पा महाराज देहावसानानंतर 1962 पासून त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली.
 
- समाजप्रबोधनचे कार्य म्हणून डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबा महाराजांनी सुरू केली.
 
- पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी बबामहाराजांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले होते.
 
- बाबामहाराजांनी (Baba Maharaj Satarkar) सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्त केले.
 
- 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी ‘श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था’ स्थापना केली. 60 ते 70 हजार भाविकांना या संस्थेमार्फत विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि औषधे पुरवली जातात.
Powered By Sangraha 9.0