फर्निचर दुकानाचे मालक ते 70 हजार वारकर्यांना मदत करणारे कीर्तनकार!
- बाबामहाराजांचा प्रेरणादायी प्रवास
- कायद्याचे घेतले होते शिक्षण
दिनांक :26-Oct-2023
Total Views |
मुंबई,
Baba Maharaj Satarkar : बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा असून, त्यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. मात्र, फार कमी लोकांना बाबा माहाराज सातारकरांच्या जीवनप्रवासाबद्दल ठाऊक आहे. बाबा महाराज सातारकारांनी केवळ किर्तनकार म्हणून काम केले नाही, तर या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणेचेही काम केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबा महाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकर परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी त्यांनी चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचे शिष्य झाले.