तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
Ravana Dahan विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने रावण दहन तसेच शस्त्र पूजन कार्यक्रम स्थानिक कॉटन मार्केट येथे आयोजित करण्यात आला होता. प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषद नागपूर येथील महानगर मंत्री अमोल ठाकरे होते. महंत सुरेश शास्त्री, आमदार समीर कुणावार, कृउबा समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, भुपेंद्र शहाणे, अतुल वांदिले, विहिंप जिल्हामंत्री राजेंद्र राजपुरोहित, आशिष परबत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते अमोल ठाकरे यांनी हिंदू बांधवांनी जातीच्या बाहेर येऊन हिंदुत्वाचा झेंडा रोवण्यासाठी समोर आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी येथील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. Ravana Dahan यशस्वीतेसाटी विहिंप मंत्री सचिन धारकर, सहमंत्री शरद कोनप्रतिवार, बजरंग दल संयोजक दीपक शर्मा, उत्सव समिती प्रमुख दिनेश वर्मा, गोलू राणा, प्रशांत तिवारी, मयूर बसंतांनी, धर्मा जोशी, शुभम जैस्वाल, आकाश आईटलावार, रवींद्र खंडाळकर, संजय कडू, तीलक जैस्वाल, भूषण जोशी, स्वराज बेलेकर, ओम शर्मा, पियुष पाखराणी, लाला जैस्वाल आदींनी परिश्रम घेतले.