तभा वृत्तसेवा
भंडारा,
darshan of Lord Shri Rama अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे आणि काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मातृशक्ती आज रवाना झाली. जय श्रीराम चा जयघोष करीत अयोध्येसाठी निघणा-या वाहनांना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि खासदार सुनील मेंढे यांनी भगवा झेंडा दाखवून रवाना केले.

विश्वमांगल्य सभा धर्म संस्कृती शिक्षा विभाग द्वारा आयोजित धर्मजीवन दर्शन यात्रेला आज 27 रोजी भंडारा येथून प्रारंभ झाला. विश्वमांगल्य सभेच्या शुभांगी मेंढे यांच्या नेतृत्वात भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील 127 महिला प्रयागराज, काशी विश्वनाथ आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे जाऊन दर्शन घेणार आहेत. श्री बहिरंगेश्वर मंदिर परिसरातून या मातृशक्तीच्या वाहनांना अयोध्येच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यापुर्वी श्री बहिरंगेश्वर मंदिरात समस्त महिला, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा.सुनील मेंढे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. darshan of Lord Shri Rama या यात्रेत सहभागी प्रत्येक महिलेचा जय श्रीराम चा दुपट्टा घालून पालकमंत्री आणि खासदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर जय श्रीराम चा जयघोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोलताशाच्या गजरात पालकमंत्री आणि खासदारांनी भगवी झेंडी दाखवीत गाडया रवाना केल्या. एका सकारात्मक हेतूने काढली जात असलेली धर्मजीवन दर्शन यात्रा अत्यंत महत्त्वाची असून मातृशक्तीच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल असे यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. कोटयवधी भारतीयांचे स्वप्न श्रीराम मंदिराच्या रुपाने साकार होत आहे. त्यामुळे हा प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. 30 ऑक्टोबर पर्यंत यात्रा राहणार असून नंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. यात्रेत सहभागी महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. श्रीराम प्रभूंचे दर्शन हा भाग्याचा विषय असल्याने त्याची ओढ प्रत्येकाच्या मनी असल्याचे यातून दिसत होते. यावेळी उल्हास फडके, चैतन्य उमाळकर, संजय एकापुरे, डॉ. नरेंद्र व्यवहारे, विकास मदनकर, मंगेश वंजारी, अनुप ढोके, तुषार काळबांधे, माला बगमारे, गीता सिडाम, रोहिणी आस्वले, अविनाश ब्राह्मणकर, महेंद्र निम्बार्ते, आकाश फाले, भूषण महाकाळकर, बंटी तांडेकर, सुखदेव वंजारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.