आंतर जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या उपक्रम
साखळी पद्धतीने 55 सामने होणार

    दिनांक :28-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Vidarbha Cricket Association : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या वतीने स्व. भास्कर जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ 15 वर्षाखालील आंतर जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हे सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार असून सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस या स्पर्धेला सुरुवात झाली.
 
Vidarbha Cricket Association
 
स्पर्धेचे उदघाटन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रिकेट मैदानावर 28 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. सर्वप्रथम स्व. भास्कर जोशी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमा करिता अध्यक्षा म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून (Vidarbha Cricket Association) विदर्भ क्रिकेट संघटनेचे सहसचिव चंद्रकांत मानके, जनरल मॅनेजर परेश दाऊदखाने, वर्धा जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभ जोशी, वर्धा जिल्हा क्रिकेट संघटनेचे रणजीत तसेच यवतमाळ जिल्हा संयोजक बाळू नवघरे उपस्थित होते. कार्यक्रमाची संचालन प्रा. डॉ. दिनानाथ नवाथे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय पांडे व आभार अल्लाद लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व खेळाडू तसेच आशिष सोळंके, समीर पाचकवडे, विवेक दलवाणी, यश सूर्यवंशी, योगेश नवाथे, अविनाश जाधव, शिरीष ठाकूर उपस्थित होते.