जैन मंदिरतर्फे डायलिसिस मशीनचे लोकार्पण

29 Oct 2023 17:08:11
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Dialysis machine : जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्रीसंघ केसरिया भवनात अनुदानामध्ये मिळालेल्या डायलिसिस मशीनचा लोकार्पण सोहळा पार पडला. जैन शासनसम्राट आचार्य विजय नेमिसुरीश्वरजी यांच्या 151 वे जन्म वर्षाचे उपलक्ष आणि जैनाचार्य विजय अशोकचंद्र सुरीश्वरजींच्या जन्मशताब्दीनिमित्त, मुंबईच्या ताराबेन छोटालाल शाह चॅरीटेबल ट्रस्टतर्फे जैन मंदिरला डायलिसिस मशीन भेट देण्यात आली.
 
Dialysis machine
 
डायलिसिस मशीनचे काम शरीरातील विषाक्त पदार्थ अपाशिष्ट, नमक और अतिरिक्त पाणी शरीरा बाहेर काढणे आहे. पोटॅशियम, सोडियम आणि कार्बोनेटसारखे काही रसायनांचे संतुलन ठेवण्यात ही मशीन उपयोगी पडते. या मशीनद्वारे रक्तचाप नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. किडनी संबंधित आजारांवर डायलिसिस मशीन उपयुक्त आहे. या Dialysis machine मशीनचा गरजू व्यक्तींना सदुपयोग व्हावा, यासाठी स्थानिक आयुर्वेद सेवा समितिला ही मशीन हस्तांतरित करण्यात आली. या मशिनचे संचालन स्थानिक रोटरी क्लब ऑफ यवतमाळ, ही सामाजिक संस्था नाममात्र शुल्क 100 रुपयांमध्ये सेवा आयुर्वेद दवाखाण्यात गरजूंना उपलब्ध करून देत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी राजेंद्र खिवसरा यांनी दिली.
 
 
डायलिसिस मशिन हस्तांतरण Dialysis machine व लोकार्पण कार्यक‘माचे प्रमुख अतिथी दानदाता मुंबईचे संदीप शाह, प्रतिभा शाह, तेजस शाह उपस्थित होते. प्रमुख वक्ता, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक‘मात जैन श्र्वेतांबर मूर्तीपूजक श्रीसंघ यवतमाळचे अध्यक्ष सुभाष जैन, ट्रस्टी व सदस्यगण, ओलावा पशुप्रेमी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आलोक गुप्ता व चमू उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ यवतमाळचे अध्यक्ष राजेश शर्मा, आयुर्वेद सेवा समितिचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल अटल, डायलिसिस सेंटरचे जवाहर जाजू उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत, तसेच मुंबईचे ट्रस्टी आणि प्रा. वसंत पुरके यांचा शाल व श्रीफळ देऊन जैन मंदिराकडून सत्कार करण्यात आला.
 
 
मंचावरील उपस्थितांचे समयोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली. डायलिसिस माहिती चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. आभार प्रकल्प अधिकारी राजेंद्र खिवसरा यांनी मानले तर संचालन संदीप तातेड यांनी केले. शहरातील विभिन्न वर्गातील, अनेक सामाजिक संस्थेतील अनेक गणमान्य मान्यवरांची या कार्यक‘माला हजेरी होती.
Powered By Sangraha 9.0