राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव साजरा

    दिनांक :29-Oct-2023
Total Views |
मंगरुळनाथ, 
Rashtra Sevika Samiti दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल मंदीर राजस्थानी चौक येथे राष्ट्रसेविका समिती मंगरुळनाथचे वतीने विजयादशमी उत्सव २८ आटोंबर रोजी हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षीका विनया निलेश पिंपळे तर प्रमुख वत्या म्हणुन वाशीम जिल्हा बौद्धीक प्रमुख आरती बावने यांची उपस्थिती होती. कृष्णाई देशपांडे यांनी शाखा लावली. पाहुण्यांचा परिचय मेघा पार्डीकर यांनी करुन दिला. प्रास्ताविक अनघा बडगे यांनी केले. वैयक्तिक गीत संपदा घोडचर यांनी गायिले. सांघिक गीत झाले. श्लोक भार्गवी महाजन यांनी तर प्रार्थना व सुविचार सुनिता घोडचर यांनी वंदेमातरम् गीत रेणुका दंडे यांनी गायिले. तर शाखेचे ध्वजावरोहण आदीती महाजन यांनी केले. याप्रसंगी शारीरीक व्यायाम,विविध प्रात्याक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.
 
 
Rashtra Sevika Samiti
 
यावेळी प्रमुख अतिथी विनया पिंपळे यांनी अध्यक्षीय भाषणातुन सांगितले की, समितीची स्थापना परकीय सत्ता असतांना मावशी केळकर यांनी करुन राष्ट्रसेविका यांचे माध्यमातुन राष्ट्रसेवा कार्य सुरु ठेवले. Rashtra Sevika Samiti आज ही राष्ट्रसेविका समितीच्या हजारो शाखाद्वारे देश सेवा कार्य सुरु आहे. प्रमुख वत्या आरती बावने यांनी विजयादशमीचे दिवशी शस्त्रपुजन, अष्टभुजादेवी पुजन अष्टभुजेच्या पराक्रमाची माहीती दिली तसेच प्राचीन काळातील परकीय आक्रमण, आधूनिक व धकाधकीच्य जीवन शैलीत मोबाईलचे आक्रमण, त्यामुळ भरकटलेली तरुणाई या विषयावर विस्तृत माहीती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्मिता देशपांडे यांंनी केले. या कार्यक्रमास श्रद्धा कांत, छाया दंडे, स्नेहल दंडे, रेवती भालेराव, जयश्री कांत, कल्याणी घोडचर, माधुरी महाजन, निता सरजोशी, जहागीरदार, वैद्य, नावंधर यांचेसह संघ कार्यकर्ते, राष्ट्रसेविका महीला, बाल राष्ट्रसेविका बहुसंखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.