नंदीग्राम एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करा

मध्य रेल्वेकडे मागणी

    दिनांक :29-Oct-2023
Total Views |
नागपूर, 
Nandigram Express : आदिलाबाद-मुंबई आणि मुंबई- आदिलाबाद ही नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरमार्गे रोज धावत होती. मात्र, कोरोना काळात या गाडीला नागपूर स्थानकावर थांबा बंद करण्यात आला. नागपूर-आदिलाबाद या मार्गावरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता नागपूर स्थानकावरून बंद करण्यात आलेली नंदीग्राम एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.
 
Railway Environment
 
2 वर्षांपासून प्रतिक्षा
मुख्यत: (Nandigram Express) नंदीग्राम एक्स्प्रेसला 2 वर्षांपासून थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गाडीला दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आले आहे. नागपूर स्थानकावरून या गाडीला पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसत कुमार शुक्ला यांनी केली आहे. ही गाडी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणल्यास नांदेड, आदिलाबाद, औरंगाबाद मार्गे प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना सुविधा प्राप्त होणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना नंदीग्राम एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. केली आहे.
 
 
गत 8 महिन्यात रेल्वेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भारतीय यात्री केंद्राने केला आहे.दुरांतो एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस दररोज धावणार्‍या या गाड्यांमध्ये नेहमीच वेटिंग असते. अशावेळी नागपूर रेल्वे स्थानकावरून बंद केलेली नंदीग्राम एक्स्प्रेस पुन्हा सुरू केल्यास प्रवाशांची सोय होईल. कोरोनापूर्वी गाडी क्रमांक 11402/11401 आदिलाबाद-मुंबई आणि मुंबई- आदिलाबाद ही नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरमार्गे रोज धावत होती. मात्र, या गाडीला दुसर्‍या मार्गाने वळविल्याने नागपूरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
 
प्रवाशांचा कमी प्रतिसाद
नंदीग्राम एक्स्प्रेस Nandigram Express मार्गावरील नागपूर-आदिलाबाद या दरम्यान प्रवाशांचा कमी प्रतिसाद लक्षात घेऊ न नागपूर स्थानकावर थांबा बंद करण्यात आला. मात्र, प्रवाशांची मागणी वाढल्यास तसा प्रस्ताव तयार करून रेल्वे मुख्यालयाला पाठविणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी दिली.