सक्षम महिला हीच कुटुंबाचा आधार : कांचन गडकरी

03 Oct 2023 20:35:40
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Kanchan Gadkari : सक्षम व सुसंस्कारी महिला हीच कुटुंबाचा आधार आहे. सर्वच क्षेत्रात आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला कार्यरत आहेत, असे प्रतिपादन कांचन गडकरी (Kanchan Gadkari) यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यवतमाळ जिल्हा महिला आघाडीद्वारा जिल्हास्तर सर्वशाखीय बहुभाषिक ब्राह्मण महिला मेळावा समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
Kanchan Gadkari
 
या प्रसंगी अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, जिल्हा अध्यक्ष संजीव जोशी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या आवताडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी देशमुख, भारती जानी, विनिता शर्मा, मधू त्रिवेदी व्यासपीठावर होत्या. प्रारंभी माता सरस्वती आणि भगवान परशुरामांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी (Kanchan Gadkari) कांचन गडकरी पुढे म्हणाल्या, भारत हा संपूर्ण जगात एकमेव देश आहे जिथे आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणून संबोधतो आणि अशा स्थितीत अजूनही महिलांवर अत्याचार होत आहेत, ही बाब अतिशय दुर्देवी आहे.
 
 
घर, कुटुंब चालवण्याची जबाबदारी आणि मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी घरातील महिलेचीच असते. त्यामध्ये जर आपण कसूर करीत असू तर आपली भविष्यातील पिढी बिघडायला वेळ लागणार नाही. आपण आपल्या व्यवसायात, नोकरीत कितीही मोठ्या व्हा, परंतु आपले कुटुंब हीच आपली पहिली जबाबदारी असली पाहिजे याकडे सतत लक्ष द्या, असे कांचन गडकरी यांनी यावेळी बजावले. स्थानिक मायादेवी भालचंद्र सभागृह, महिला विद्यालय येथे एक दिवसीय महिला मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार सरोज काशीकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी महिलांनी चूल आणि मूल सांभाळत असताना स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. या माध्यमातून स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती साधली पाहिजे, असे (Kanchan Gadkari) प्रतिपादन केले.
 
 
ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष मोहिनी पत्की यांनी यावेळी महासंघाद्वारे होत असलेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर दिवसभरात विविध सत्रांत महिला बचतगट निर्मिती, त्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय निर्मिती, लघुउद्योगांना उपलब्ध असणार्‍या विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. या सर्व विषयांवर जालना येथील सोया प्रॉडक्टच्या संचालक योगिता खांदेभराड, नागपूर येथील उद्योजक नेहा लघाटे, प्रज्ञा बापट, महागाव येथील बचतगट मार्गदर्शक गायत्री रानडे, जिल्हा परिषदचे माजी उपमु‘य कार्यकारी अधिकारी व गोवा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी राजेश कुळकर्णी यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
 
 
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून महिलांची प्रचंड उपस्थिती हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. (Kanchan Gadkari) या विविध सत्रांचे सूत्रसंचालन राधिका महाजन, सोनाली पंचभाई, वेदिका शर्मा, युक्ता तांबुळे, मोहिनी त्रिवेदी यांनी केले. आभारप्रदर्शन राम साकळे यांनी केले. मेघना डाऊ यांच्या वंदेमातरमने मेळाव्याची सांगता झाली. मेळाव्यासाठी युवा ब्राह्मण संघाचे जिल्हा अध्यक्ष परीक्षित शर्मा, सागर कोठेकर, डॉ. शिवम जोशी, ऋचा त्रिवेदी, सानिका पांडे, शुभंकर भट, कृष्णा औदार्य, शर्वरी लाखे, पीयूष देशपांडे, वेदांग जोशी, भार्गवी लाखे, शंतनू जोशी, वेदश्री शिदड, राघव कुळकर्णी, निखिलेश जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0