नवी दिल्ली,
देशातील सर्वात लोकप्रिय IAS ऑफिसर्सपैकी एक असलेली टीना दाबी नुकतीच आई झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. टीना दाबी हिने 2013 च्या बॅच UPSC टॉपर प्रदीप गावंडे सोबत आयुष्याच्या एका नवीन टप्प्यात पाऊल ठेवल्याने आई-वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. आयएएस टीना दाबी या जैसलमेरच्या कलेक्टर होत्या. आई झाल्यानंतर आयएएस जोडप्याने पहिल्यांदाच आपल्या मुलाची झलक चाहत्यांसह शेअर केली. दोन्ही कुटुंबांसाठी हा आनंदाचा प्रसंग आहे. 2 ऑक्टोबरला टीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिच्या मुलाचा चेहराही दिसत होता.
IAS टीना दाबी 2015 मध्ये IAS बॅचची टॉपर होती. ती 5 जुलैपासून प्रसूती रजेवर गेली होती, त्यामुळे 2013 च्या बॅचचे आशिष गुप्ता यांना जैसलमेरचे नवीन जिल्हाधिकारी बनवण्यात आले. प्रदीप गावंडे आणि टीना दाबी यांचा विवाह 22 एप्रिल 2022 रोजी जयपूरमधील एका हॉटेलमध्ये झाला. याआधी टीना दाबी 2020 मध्ये तिचा पहिला पती अहतर आमिर खानशी घटस्फोट घेतल्यानंतर काही काळ प्रदीप गावंडेला डेट करत होती, त्यानंतर दोघांनी 22 एप्रिल 2022 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रदीप टीना दाबीपेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे.