कानाने बहिरा, डोळ्याने आंधळा, जिवापरी गेला...!

noise pollution-dj आवाजाची तीव्रता कमी नाहीच

    दिनांक :03-Oct-2023
Total Views |
वेध
 
- विजय निचकवडे
noise pollution-dj काही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत; मात्र त्यालाही आव्हान देण्याची प्रवृत्ती म्हणजे मानवाचे सामाजिक आणि व्यक्तिगत आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये आता भर पडली आहे, ती मिरवणुकांमध्ये मोठमोठाल्या स्पीकर्सच्या अभेद्य भिंतींमधून बाहेर पडणाऱ्या कर्कश आणि असह्य अशा आवाजाची. noise pollution-dj आवाजातील माधुर्य हरपले, सालसता आणि सभ्यतेने उन्मादाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि याचा परिणाम म्हणून या कर्णकर्कश आवाजाने लोकांचे जीव घेणे सुरू केले. जीवघेणा आवाज कधी कायमचे बहिरेपण देतो तर कधी आयुष्य संपवितो. noise pollution-djयावेळी सोबतीला आंधळेपण देण्यासाठी असतात अतितीव्र अशा दिव्यांचे प्रकाशझोत! हे चलन सर्वच धर्मीयांच्या शोभायात्रा, मिरवणुका आणि रॅलींमध्ये वाढले. लग्न समारंभाच्या वरातीही यातून सुटल्या नाहीत. noise pollution-dj आनंद घेण्याच्या नावाखाली दाखविला जात असलेला बडेजाव नियम घालून देणाऱ्यांना दिसत नाही आणि मग लोकांचे जीव आवाजामुळे जातात.
 
 
 
noise pollution-dj
 
 
कुठल्याही एका नव्हे, तर सर्वच धर्मीयांच्या रीतीरिवाजानुसार शोभायात्रा, मिरवणूक, रॅली, जुलूस काढण्याची प्रथा प्रचलित आहे. हे सर्व केले जाते ते धार्मिक भावनेतून. प्रत्येक धर्मीयांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. noise pollution-dj काही वर्षांपूर्वीपर्यंत आनंद साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. कालपरत्वे त्यात बदल होत गेले. आज हेच बदल लोकांच्या जिवावर बेतू लागले. झालेले बदल वाईट आहेत का? तर मुळीच नाही. मात्र, या बदलांचा झालेला अतिरेक घातक आहे, हेच आता एक नव्हे तर अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. मिरवणूक, रॅली, जुलूस काहीही असो, कर्णकर्कश आवाजात वाजणारे डीजे आणि त्या तालावर अगदी त्याच्या समोर थिरकणारी तरुणाई आज सहज पाहायला मिळते. noise pollution-dj यामुळे सामाजिक आणि व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येत असल्यानेच ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी कायदा झाला. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या अधीन ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण कायदा २००० नुसार अनेक बंधने टाकण्यात आली. पोलिसांनाही गुन्हा दाखल करण्याचे अधिकार मिळाले. मात्र, कायदा असूनही आवाजाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवत नाही.
 
 
noise pollution-dj चार दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे दोन तरुणांचा विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजामुळे हृदयावर दाब येऊन अटॅक आल्याने मृत्यू झाला. श्रीगोंदा येथे एक शिक्षक डीजेच्या किंचाळवाण्या आवाजाने कोमात गेले आणि महिनाभराने त्यांचाही मृत्यू झाला. तर, बिहार राज्यातील सीतामढी येथे एका नवरदेवाला डीजेच्या आवाजामुळे लग्न मंडपातच जिवास मुकावे लागले. आज या सर्व घटना डोळ्यांपुढे आहेत, तरीही आमचे डोळे उघडत नाहीत. noise pollution-dj ध्वनी प्रदूषण कायदा आहे, पण तो कागदावर. लहान मुले, वृद्ध आणि विशेषकरून हृदयविकाराचे रुग्ण या आवाजाचे बळी ठरत आहेत. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यात सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजताना आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. ४५ ते ६५ डेसिबल एवढ्या आवाजाची मर्यादा असताना आज ही १०० डेसिबलपर्यंत पोहोचली आहे. ही आवाजाची जीवघेणी स्पंदने हृदयापर्यंत पोहोचून हृदयावर निर्माण होणाऱ्या अधिकच्या दबावाने लोकांचे जीव जात आहेत, हे वैद्यकीयशास्त्राने सिद्ध केले असतानाही, आमच्या आनंदाच्या कल्पनेतील कर्कश आवाज काही कमी होताना दिसत नाही. noise pollution-dj या आवाजासोबत सध्या रंगीबेरंगी दिव्यांचे तीव्र प्रकाशझोत आंधळेपणा देण्यासाठी सज्ज आहेत. म्हणूनच तर नाशिकमध्ये चार तरुणांना त्यांची दृष्टी गमवावी लागली.
 
 
डीजेचा वाढलेला आवाज आणि डोळे दीपविणारे प्रकाशाचे झोत आज सामाजिक समस्या म्हणून उदयास येत आहे. सोबतच व्यक्तिगत संकटही ओढवून घेण्याचे काम आम्ही करीत आहोत. noise pollution-dj आनंद साजरा करायलाच हवा; मात्र आनंदाचे पर्यवसान दु:खाच्या घटनेत होऊ नये, याची काळजीही आपल्यालाच घ्यावी लागणार नाही. ज्या धार्मिक भावनेतून उत्सव साजरे करायचे, ती भावना जिवंत असल्याचे दाखविण्याची ही वेळ आहे. कारण आम्हाला जर विसर पडला तर त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी असलेली पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा तेवढी सजग हवी; मात्र ती कधीच आणि कुठेच दिसत नाही. निघणाऱ्या  जुलूस, मिरवणुकांना पोलिसांचे संरक्षण असते. म्हणजे कर्मचारी सोबत चालतात. ना त्यांचे कान बहिरे होत, ना डोळे दीपत! केवळ या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना कर्तव्याचा तेवढा विसर पडतो. noise pollution-dj डोळ्यादेखत नियम विसरल्याचे दिसत असेल, तर त्याची जाणीव करून देण्याचे सौजन्य न दाखविणारे पोलिस तक्रारीची वाट पाहात असतात. तक्रार करा, मग कारवाई अशा स्पष्ट मानसिकतेत जर पोलिस यंत्रणा असेल तर एक नव्हे अनेकांचे जीव हा आवाज घेईल आणि अनेकांच्या आयुष्यातील प्रकाश अंधारात बदलेल.
९७६३७१३४१७